कँन्सर एक आशिर्वाद
तंबाखु, गुटखा खाणारे व सिगारेट बिडी पिणाऱ्या मित्रांनी कृपया कोणत्याही हॉस्पिटल मधील कँन्सर विभागाला भेट द्यावी. व त्या रूग्णाची अवस्था बघावी. त्याच्या शरिराची झालेली अवस्था,त्याच्या कुटुंबाची अवस्था हा आजार ठिक करण्यासाठी येणारा खर्च याचा विचार करावा . का ?? तुम्ही विनाकारण स्वतःच्या व स्वतःच्या कुटुंबातील व्यक्ती च्या आयुष्या सोबत खेळत आहात ? का??
तुम्ही तुमच्या पत्नि व मुलांन वर किती प्रेम करतात .पण का ? त्याना त्रास देण्यासाठी व्यसने करतात.
मला कँन्सर होणार नाहीे ,आम्ही पुड्या खालल्यावर तोंड धुतो , असे म्हणनारे खुप सारे तुर्मखान तुम्हाला तिथे दिसेल.. जगणे खुप सोपे आहे मरणे खुप अवघड आहे.
टिप ::मला माहित आहे तुम्ही स्वतःच्या पैश्याचे घेवुन खातात. माझ्या बापाचे पैसे घेवुन खात नाही. #savemoneysavelife
Comments
Post a Comment