मरावे परि किर्तीरुपी उरावे

🎯🎯मरावे परि किर्तीरूपी उरावे🎯🎯|

काही दिवसा पुर्वी एका हॉस्पिटल मध्ये गेलो होतो. तिथे एक पेशंट किरकोळ आजारी होता. मरणास खुप घाबरत होता.त्याना स्वतःची स्वतःच्या घराची स्वतःच्या वावराची स्वतःच्या घराची खुप काळजी वाटत होती . ते स्वतःच्या आयुष्याची भीख मागत होते त्याची ती अवस्था पाहुन मला माझा मित्र अमित धस च्या वडिलाची आठवण आली. अमित चे वडिल रावसाहेब धस पाटबंधारे खात्या मध्ये अधिकारी होते.आणि खरचं त्याच्या बद्दल मला अभिमान वाटायला लागला. हजारो वेळेस त्यांना सलाम करावा, लाखो वेळेस त्यांना मानाचा मुजरा करावा अशी माझी तळमळ व्हायला लागली.
               दिवाळीच्या महिन्यात दौलताबाद रोड वरील हॉटस्पॉट धाब्या समोर त्याचे Accident झाले समोरील ट्रकचा ड्रायव्हर दारू पिलेला होता व एक दोन दिवसा पासुन झोपलेला नव्हता . त्यांच्या पायाला खुप मार लागला खुप सारे रक्त गेले. त्याच्या सोबत त्याचा मित्र जाग्यावरच गेले होते परंतु त्याना वाटले बेशुध्द झाला . १५ ते २० मिनिटाने Ambulance आली .त्यानंतर ते घाटीत गेले  तिथे अमित व त्याचा भाउ अक्षय अभिजीत पोहचले ते म्हणाले पप्पा आपन दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये जावु पण ते म्हणाले नाही येथील डॉक्टर माझे मित्र आहे तु त्याना फोन कर नंतर त्याच्या वर उपचार सुरू झाला .त्या वेळेस त्याची अवस्था खुप नाजुक झाली होती . शरीरातुन खुप रक्त वाहत होते .त्याच्या सोबत त्याचे मुलेही होते पण त्यांना काहीच भिती व दुःख वाटत नव्हते . ते डॉक्टरला म्हणाले , ""जर मला काही झाले तर माझे सर्व Organ Donate करून टाका."" आणि ५, १० मिनिटाने त्याचे डोळे मिटले . सर्व वातावरण निः शब्द , जो व्यक्ती मरणाच्या दाराजवळ उभा होता .तो  स्वतःच्या आयुष्यासाठी प्रार्थना करत नव्हता ,भिख मागत नव्हता कोणती याचना ,नवस बोलत नव्हता ,कोणतीही दुवा मागत नव्हता, देवा माझ्या मुलाना सुखी ठेव  असेही म्हणत नव्हता तर त्याची ईच्छा होती देण्याची, आपल्या शरीरातील सर्व अवयव समाजासाठी देण्याची. काही  आयुष्य फक्त घेण्यासाठीच जगतात.त्याना फक्त समाजाकडुन घेण्याची अपेक्षा असते तर काही जीवनात फक्त देतच राहतात. सदैव आयुष्य जगतानी व मरतानाही. शेवटच्या क्षणी सुध्दा काही मागत नाही.
                  अश्या थोर व्यक्तीस ,
                    अश्या थोर मानवास सलाम
                       सलाम त्याचा विचाराला 
                           सलाम त्याच्या त्यागाला
                              सलाम त्याच्या जीवनाला
             
                 

Comments

Popular Posts