""गुलामाच्या फौजा "" कविता
गुलामाच्या फौजा भारतात
कश्या माना डुलवतात
कोणी गुबुगुबू म्हणल्यावर
नुसत्या मान डुलवतात
तुकारामांना हे वैकुठी धाडतात.
बळीराज्याला पाताळात गाडतात
कबीराला हात पाय बांधुन पाण्यात फेकतात
संत नामदेवाला जल समाधी देतात
चोखोबाला हे ठेसतात
महापुरूषाना मानन्याचे हे ढोंग करतात
ते आम्हाला अंधभक्त बनवणार
आमच्या मात्र भावना दुःखवणार
ते आमच्या टाळु वरचे लोणी खाणार
आम्ही एकमेकांचे पाय ओढणार
ते आमचे एक एक नेते मारणार
आम्ही मात्र त्याचेच अनपेड पोलिस होणार
ते आम्हाला मुत्र पाजणार
आम्ही मात्र दुध दगडावर टाकणार
ते आम्हाला जेल मध्ये टाकणार
आम्ही मात्र तेल दगडावर टाकणार
ते आम्हाला मंदिर बांधायला लावणार
आणि मंदिर स्वतःच्याच ताब्यात घेणार
मंदिराचे संरक्षण आपण करणार
मंदिराची दान पेटी ते सांभाळणार
विजय नामदेव त्रिभुवन
मुकुंडवाडी औरंगाबाद
मोन 8605895244
Comments
Post a Comment