परिसवग्गा सुत्त

🌻🌻परिसवग्गा सुत्त🌻🌻

आपण एखादी मिटिग ,प्रोगाम,सेमिनार, चर्चासत्र किंवा परिषद अधिवेशन परिसंवाद  घेताना तथागत गौतम बुध्दानी सांगितलेले "" परिसवग्गा सुत्त "" नक्की आपल्याला उपयोगी पडेल.व्यवस्थित समजावुन घ्यावे

भिक्खुनो परिषद दोन प्रकारची असते .
१) उथळ परिषद तसेच गंभीर परिषद
२) विखुरलेली धर्म परिषद ( विस्कळीत ) तसेच समग्र परिषद
३) अनग्र ( कनिष्ठ/ हलकी ) परिषद तसेच अग्र (क्ष्रेष्ठतम /उच्च) परिषद
४) अनार्य परिषद तसेच आर्य परिषद
५) निस्सार परिषद व सारयुक्त परिषद
६) दुर्विनित ,प्रश्नोत्तरद्वारा अविनित परिषद व सुविनित व प्रश्नोत्तराद्वारा विनित
७) भौतिक गोष्टींना महत्त्व  देणारी परंतु धर्माला महत्त्व न देणारी तसेच धर्माला महत्त्व देणारी
८) विषम परिषद आणि सम परिषद
९) अधार्मिक परिषद तसेच धार्मिक परिषद
१०) अ धर्मवादी परिषद आणि धर्मवादि परिषद
    गंभीर परिषदेत भिक्खु उध्दट नसतात,मानी-स्वभावाचे नसतात. चंचल नसतात , वाचाळ नसतात ,संयतभाषी नसतात,विस्मृत -स्मृतीचे नसतात, बुध्दिमान असतात, चित्ताची एकाग्रता साधणारे असतात, भ्रांत-चित्ताचे नसतात. तसेच संयीत इंद्रियाचे असतात.
समग्र परिषद - ज्या परिषदेत भिक्खु मिळुन,प्रसन्नतापुर्वक ,वाद-विवादा शिवाय ,दुध-पाण्याप्रमाणे मिसळल्यासारखे एक दुसऱ्याकडे मैत्रीभावनाने पाहत विहार करतात अशी परिषद समग्र परिषद असते

     संदर्भ :सुत्तपिटक अंगुत्तर निकाय भाग१/८१ 
          अनुवादक : मा.शं.मोरे

Comments

Post a Comment

Popular Posts