भगवान बुध्दांनी सांगीतलेली गुरूची शिक्षकाची 25 कर्तव्य व गुण

*** ""मिलिंद प्रश्न"" ग्रंथातील काही निवडक भाग पोस्ट क्रं . ०९
सिध्दार्थ गौतम बुध्दांनी विश्वातील मानवाच्या कल्याणासाठी सांगीतलेल्या उपदेशावर आधारीत मिलिंद राजाने भंते नागसेनास विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे
*** शिष्याप्रती आवार्याचे (गुरु) पंचवीस कर्तव्य :::
गुरूच्या अंगी असलेले २५ सद्गुण:::

१) आपल्या शिष्यावर गुरूने सदैव देखरेख ठेवली पाहिजे.
२) कोणते नियम पाळावे व कोणते कर्तव्य त्याज्य मानावे यासंबंधी सदैव उपदेश करीत राहिले पाहिजे
३) कोणत्या गोष्टीत दक्षता बाळगावी व कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करावे यासंबंधी उपदेश देत राहिले पाहिजे
४) त्याने खान - पान व झोपणे इत्यादी बाबीकडे लक्ष ठेवले पाहिजे
५) आजारात लक्ष घातले पाहिजे
६) आता पर्यत त्याने काय मिळविले आणि काय नाही या बाबींकडे लक्ष ठेवले पाहिजे
७) त्याच्या चारित्र्याकडे लक्ष ठेवले पाहिजे
८) भिक्षा पात्रात जे काही मिळाले असेल ,ते वाटुन खाल्ले पाहिजे
९) ''घाबरू नकोस हेही तुला समजेल'' असे म्हणुन त्यास प्रोत्साहित केले पाहिजे.
१०) त्यांनी कोणाची संगत करावी याविषयी वारंवार सांगत राहिले पाहिजे
११) शिष्याने कोणत्या गावीजावे हे ही सांगितले पाहिजे
१२)त्याने कोणत्या विहारात जावे हे ही सांगितले पाहिजे
१३) त्याच्याशी गप्पा ठोकत व्यर्थ वेळ घालवु नये.
१४) त्याचे दोष दिसुन आल्यास सहसा त्याला गुरूने क्षमा केली पाहिजे
१५) त्याला मन लावुन दिले पाहिजे
१६) अनाठाई त्याला सुटी न देता शिकवले पाहिजे
१७) शिष्या- पासुन न्यान लपवुन ठेऊ नये
१८) आपल्या जवळील सर्व ग्यान उत्साहपुर्वक शिष्यास शिकवले पाहिजे
१९) शिष्यास आपला ग्यान पुत्र समजुन गुरूने त्यावर पुत्रवत प्रेम ठेवले पाहिजे.
२०) तो आपल्या उद्दिष्टांपासुन वळणार नाही,याची खबरदारी गुरूनी सतत आपल्या मनात ठेवली पाहिजे
२१) गुरूने शिष्याप्रती मैत्रीभावनेने प्रेमळ वर्तन ठेवले पाहिजे
२३) त्यावर आपत्ती आली असता ,त्याला सोडुन न देता त्याचे रक्षन केले पाहिजे
२४) त्याला शिकवण्यासारख्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये
२५) धर्मापासुन शिष्य ढळत असल्यास त्याला सावरून धरले पाहिजे.

       जाणिव जागृती अभियान
        जागे व्हा जागे करा
     मो. नं. ८६०५८९५२४४

Comments

Popular Posts