आसारामची हसाराम दिंडी

काल दि .३० नोव्हेबर रोजी आसाराम बापुची दिंडी  मुकुंदवाडी रामनगर औरंगाबाद भागात निघाली होती.  भारतीय लोकांच्या मानसिकतेची किव करावीशी वाटली . एक गाडी सजवली होती त्यावर हसाराम चा फोटो लावला होता. लोके खुप भावनिक होउन पावली खेळत होते. ढोल टाळ वाजवत होते.  काही लोक त्या दानवाला देव समजतात  . निर्लज्जपनाचा कळस गाठला .सर्व बुध्दी गहाण ठेवली का ? की बुध्दीच नसल्याचे  लक्षण आहे . भारत महासत्ताक बननार आहे .२०२० मध्ये अश्या डोक्यांनी अपाहीज असणाऱ्या लोकांच्या भरवश्यावर बनणार आहे  का????  आणखिन हसाराम चे घरातील फोटो बाहेर आले नाही. भारत देशातील काही लोक चंद्रावर जायचे स्वप्न पहात आहे तर काही अश्या भोदु बाबाच्या नांदी लागुन त्याच्या सर्व पिढीला मानसिक गुलाम बनवत आहे.
                                            जय भारत

Comments

Popular Posts