"" चन्ना "" सिध्दार्थाचा बालमित्र
** *चन्ना ****
सिध्दार्थाचा बालमित्र तु
सिध्दार्थाची छाया होता .
रक्ताच्या नात्यापेक्षा मित्राचे नाते क्षेष्ट ठरविणारा होता.
सिध्दार्थाला लहानपणी पडलेल्या खुप साऱ्या प्रश्नाचे उत्तर तु होता .
सिध्दार्थाच्या जन्माची वार्ता, शुध्दोधनाला सांगण्यासाठी ,
तुझा पिता आला होता.
शुध्दोधनाने ऐकुन भावी चक्रवृत्ती सम्राटाच्या जन्माची वार्ता .
काहीही मागण्याचे दिले वचन. तुझ्या पित्याने सोने, चांदी ,
काहीच नाही मागितले .
माझ्याही मुलाचा जन्म झाला. त्याला फक्त सिध्दार्थाचा मित्र करा .
फक्त ऐवढेच विनविले.
संपुर्ण आयुष्य तुझ्या पित्याचे वचन ,
सिध्दार्थाचा सखा बनुन निभावलेस.
गृहत्याग करत्या वेळेस सर्वाचा तुझ्यावर विश्वास होता.
घेवुन येशील माघारी तु सिध्दार्थाला.
सर्वाच्या नजरा रोखुन होत्या तुझ्या वापस ऐण्याकडे.
पण सिध्दार्थाचे सर्व अलंकारच तु फक्त घेवुन आलास.
सिध्दार्थाने दिले वचन तुला न्यान प्राप्त झाल्यावर
येईल मी पुन्हा ।
येईल मी पुन्हा ।
येईल मी पुन्हा ।
कवि: विजय नामदेव त्रिभुवन
मो नं 8605895244
औरंगाबाद.
Nice
ReplyDelete