देवदत्त

*कुलदिपक देवदत्त*

सिध्दार्थ गौतम बुध्दाने आयुष्य भर सर्व जगावर प्रेम केले .आणि जगाला  प्रेमाचाच संदेश दिला . आणि त्यानी कधीच कोणाचा  तिरस्कार केला नाही .पण काही देवदत्ताचा तिरस्कार करतात. देवदत्ताचा तिरस्कार गौतम बुध्दानेही केला नाही तर  आपण का देवदत्ताचा तिरस्कार करावा????

हंस तुझाही होता, हंस सिध्दार्थाचा ही होता.
तु क्षत्रीय धर्म निभावत होता .
सिध्दार्थ मानवता धर्म निभावत होता।

तुझे शाक्य राज्यावर प्रेम होते .सिध्दार्थाचे सर्व जगावर प्रेम होते.
तुला शाक्य राजा बनायचे होते. सिध्दार्थाला सर्व जगाचे दुःख हरायचे होते.

यशोधरा तुला ही हवी होती.
पण ती सिध्दार्थावर प्रेम करीत होती.

देवदत्ता तु बुध्दीनी चालत होता सिध्दार्थ ह्दयाने चालत होते.
तुला कोणत्याही पध्दतीने विजय हवा होता.
सिध्दार्थाला सर्वाचा विजय हवा होता.

भिक्खु संघात ही तु प्रवेश केलास.
भिक्खुच्या नियमावर सक्ती करावयाचे तु ठरवत होता.
पण बुध्दाला फक्त प्रेमाचाच मार्ग ठाऊक होता.
चांगल्या गोष्टीची सक्ती ही चांगलीच असते.
पण ती ची सक्ती करायची नसते.

प्रसेनजीत चे मुकूट सिध्दार्थाच्या डोक्यावर होते
ते उडविल्यावर शाक्य विजयी होणार होते.
सिध्दार्थाने दाखविला तुझ्यावर विश्वास.
होती तुला संधी बदला घ्यायची .सिध्दार्थाचे मुंडके उडवायची.
पण सर्वाच्या नजरेत धनुर्धर सिध्दार्थ होता.
पण सिध्दार्थाच्या नजरेत सर्वक्ष्रष्ट धनुर्धर तु होतास.
टाकला विश्वास तुझ्यावर
घेतला धनुष्य बाण तु हाथी
हार जीत ही तुझ्याच हाथी व
सिध्दार्थाच्या माथी होती.
उडवायचे होते मुकुट
अचुक निशाणा तुझा मुकुटावरती बसला.
प्रसेनजीतचे मुकुट सिध्दार्थाच्या डोक्यावरून खाली पाडले .
सर्व शाक्याच्या सन्माना सोबत त्याचे मन ही जिंकलेस.

Comments

Popular Posts