मृत्यु

मृत्यु

ना कोणासाठी थांबतो
ना कोणासाठी पळतो
ना कोणासाठी हसतो
ना कोणासाठी रडतो
ना कोणासाठी बसतो
ना कोणासाठी उठतो.

मृत्यु ना क्षीमंत बघतो
ना गरीब बघतो
मृत्यु ना लहान बघतो
ना मोठा बघतो
मृत्यु ना लहान बघतो
ना गरीब बघतो
मृत्यु ना बालक बघतो
ना पालक बघतो
मृत्यु ना तरूण बघतो
ना म्हतारा बघतो
मृत्यु ना दिवस बघतो
ना रात्र बघतो
मृत्यु ना अंधार बघतो
ना उजेड बघतो
मृत्यु ना अमावस्या बघतो
ना पौर्णिमा बघतो
मृत्यु ना नर बघतो
ना मादी बघतो
मृत्यु ना आई बघतो
ना वडील बघतो
मृ्त्यु ना भाऊ बघतो
ना बहीण बघतो
मृत्यु ना सत्य बघतो
ना असत्य बघतो
मृत्यु आहे अटळ
तो कधीही येणार
हे जीवन परत कधीच नाही भेटणार
किती दिवस आपन मृत्युला टाळणार
शेवटी कुठे तरी आपल्याला गाठणार
म्हणुन ठेवावे आपण याचे हमेशा ध्यान
सजवावे जीवनाचे रान
कारण कधीही सोडुन जातात प्राण
लहानपणी जगात आपण येतो
दुनिया हसती आपण रडतो
मृत्यु बदलुन टाकतो सर्व डाव
आपण हसतो आणि जग रडते.
मृत्यु म्हणजे निद्रा
२ मिनिटाची निद्रा देते किती समाधान
मृत्यु तर आयुष्य भराची निद्रा
सम्यक समाधी त्या मुळेच तर
संत घेत जिंवत पणी समाधी..
ज्या प्रमाणे करतो आपन जन्माचे स्वागत
त्याच प्रमाणे करावे मृत्युचेही स्वागत.
           
                 विजय नामदेव त्रिभुवन
                       

Comments

Popular Posts