भीमाकोरेगाव लढाईचे वर्णन व म्हत्तव नक्की वाचा प्रा. दिलीप महालिंगे सरानी सांगितलेली.
प्रा दिलीप महालिंगे आैरंगाबाद यांनी भीमाकोरेगाव शौर्य दिना निमित्त केलेल्या मार्गदर्शनातील काही मुद्दे:::: दिं १/०१/२०१८ स्थळ निसर्ग कॉलनी पेठेनगर औरंगाबाद
१) ज्या महाराना पेशवाई नष्ट केली ते जातीवंत महार होते . आपण कसे आहोत याचा विचार करावा.
२) खुप जन बोधीवृक्षा खालुन उठुन मोदीवृक्षा खाली बसत आहे.
३) त्या शुर महावीरांनी त्या दिवशी सकाळी लढाई सुरू होण्यापुर्वी सुर्याला सांगितले होते की तु आज तळपायचे नाही आज महार तळपणार आहे.आणि महार ईतके तळपळले ईतके तळपळले की सुर्य मावळला त्यावेळेस जगातील सर्वात विषारी व्यवस्था पेशवाई संपवलेली होती.
४)आपल्या शरीरात भीमाकोरेगाव मधील त्या शुरवीराचे रक्त आहे.भीमाकोरेगाव हे आमचे माहेर आहे. हे आमचे कुळ आहे.स्वाभिमानाच कुळ आहे।
५) महाराच्या डोक्यात काय होते?ज्यानी आमची माणुसकी नाकारली,माणुसकी पायदळी तुडविली देशातील या संस्कृतीची लाज वाटायला हवी होती.ही लाज त्या शुरवीराना वाटली आणि स्वाभिमानाने जगण्यासाठी जगाच्या ईतिहासातील सर्वात अमानवीय व्यवस्था पेशवाई संपवली.
६) लढाई अगोदर सिध्दनाक ला पेशव्यानी बोलावले होते . सिध्दनाक ने त्याना ही लढाई जिंकुन देण्याची हमी दिली होती . सिध्दनाकनी त्याना विचारले होते मला काही हवे आहे .पेशवे म्हणाले मांग तुला काय हवे आहे त्या वेळेस सिध्दनाक म्हणाला मला काही लागत नाही मला माझ्या समाजासाठी हवे आहे। त्यानी विचारले काय माझ्या समाजातील लोकाच्या गळ्यातील मडके व पाठीमागील झाडु काढावे त्या वेळेस पेशव्यानी महाराचा अपमान केला.
७) पेशव्यानी सिध्दनाकला धमकी दिली की फक्त ऐवढी लढाई होवु दे मग मी तुझ्या कडे व तुझ्या समाजाकडे पाहतो. त्यावेळेस सिध्दनाक महार म्हणाला तुम्ही काय पाहणार ,तुमच्याकडे पाहण्यासारखे काहीच राहणार नाही आणि तसेच झाले .
भीमाकोरे गाव लढाई नंतर पेशव्याकडे काहीच राहिले नाही.
८)महाराचे दोन प्रकार आहे एक दिलदार महार दुसरा कुचका महार पहिल्या प्रकारातले भिमाकोरेगाव लढाईतील शुरवीर तर दुसरे आजकाल चे "याचे काही खरे नाही, त्याचे काही खरे नाही ,तो असाच आहे.हा असाच आहे " असे बोलणारे त्याच्यातीलच एक जन सिध्दनाकला म्हणाला आपण फक्त ५०० आणि ते ३०००० मरायचे आहे का?? त्यावर सिध्दनाक म्हणाला तुम्ही आतातरी जीवंत आहात का? आपण जिवंतच कधी होतो? ""मेलेल्याना मरणाची काय भिंती""
९) ही लढाई काही बायकोसाठी जमिनीसाठी राज्यासाठी नव्हती तर ती फक्त स्वाभिमानासाठी होती। ही लढाई आईबहिणीची दिवसा ढवळ्या होणाऱ्या विटंबना रोखण्यासाठी होती , ही लढाई माणसाला माणसासारखे जगता येता यावे यासाठी होती.
१०) आजकाल थोडासा पैसा पद आले ती आपण आपल्या जात बांधवाला विसरून जातो. आणि आपण ऐकमेका बद्दल असे म्हणतो," त्याला आमचं पाहवतच नाही " अरे तुझ्याकडे आहेच काय? आपली कर्तव्य पार पाडा .
जय भिम जय भारत
नमो बुध्दाय
विजय नामदेव त्रिभुवन
मो .नं.8605895244
Comments
Post a Comment