राज कृपेवर कोणीही अवलंबुन राहु नका
सिध्दार्थ गौतम बुध्दाची सामाजीक व राजकीय प्रश्नावरील प्रवचने:::::::
**** राजकृपेवर अवलंबुन राहू नका ****
भारतातील काही बौध्दधर्मीय, आंबेडकरी समाजातील काही लोक,पुरोगामी चळवळीतील सर्व घटक,शिवरायाचा प्रतेक मावळा, धम्मप्रचारक सरकारच्या मदतीची अपेक्षा करतात. आता पर्यतची सर्व सरकारे लोकांना फसवित आले आहे. त्याचे खायचे व दाखवायचे दात वेगळे आहे. समाजातील काही घटक या गोष्टीमुळेच लाचार झाला आहे. त्या.सर्वासाठी ""भगवान बुध्द आणि त्यांचा धम्म "" लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकरलिखित या ग्रंथातील पान नं.३६४ वरील लेख.
भगवंतांविरूध्द उलटलेला देवदत्ताचा पक्ष राजा अजातशत्रुने घेतला होता. सकाळ - संध्याकाळ पाचशे गाड्यातुन अन्नपात्रे पाठवुन तो देवदत्ताच्या शिष्यगणांना पोशीत होता. तेव्हा काही भिक्खु भगवंतासमोर आले आणि साभिवादनपुर्वक त्यांच्या शेजारी बसले. त्यांनी भगवंतांना देवदत्तासंबंधाची वार्ता सांगितली.
तेव्हा भगवंत भिक्खुंना म्हणाले, '' राजाकडुन कृपेची ,खुशामतीची, कोणत्याही प्रकारच्या लाभाची आशा धरू नये; जो पर्यत अजातशत्रु राजा देवदत्ताला सकाळ संध्याकाळ पाचशे गाड्यांत अन्नपात्रे भरुन अन्न पुरवीत आहे तो पर्यत देवदत्ताची अधोगतीच होत राहणार. सन्मार्गात त्याच्या प्रगतीची अपेक्षा करणे व्यर्थ होईल.
भिक्खुंनो, ज्याप्रमाणे कुत्र्याच्या नाकावर काळीज चुरडुन थापले तर तो कुत्रा अधिकच पिसाळतो.त्याप्रमाणे जोपर्यत राजा अजातशत्रु देवदत्ताला अशा रितीने पोशित आहे, तो पर्यत तो देवदत्त अधोगतीलाच जात राहणार ; त्याची सुधारणा होऩार नाही. बंधुनो ,राजाची खुशामत ,कृपा,त्यापासुन होऩारे लाभ हे भयदायक आहेत.
"" सर्वोच्च अशी अढळ शांती साधण्याच्या मार्गातील ते कटु आणि दुःखदायक असे अडसर आहेत.''
भिक्खुंनो , ""तुम्ही स्वतःला हे शिकवले पाहिजे की, आमच्या वर लाभ , कृपा , खुशामत यांचा वर्षाव होणार असेल तर आम्ही त्याचा निषेध करु आणि त्यांचा वर्षाव होऊ लागताच तर त्याला आमच्या मनावर पकड घेऊ देणार नाही; प्रभुत्व मिळवु देऩार नाही, त्याच्या लालसेने राजाचे दास बनवु देणार नाही ""
जय भिम जय भारत
जय भिमराय जय शिवराय
नमो बुध्दा नमो धम्मा नमो संघा
विजय नामदेव त्रिभुवन
मो.नं. ८६०५८९५२४४
Comments
Post a Comment