मैत्री चे फायदे

मैत्रीचे गुण भगवंत सुनन्द नावाच्या सारथ्याला मैत्रीचे गुण सांगतात.
** ""मिलिंद प्रश्न"" ग्रंथातील काही निवडक भाग पोस्ट क्रं . १३
सिध्दार्थ गौतम बुध्दांनी विश्वातील मानवाच्या कल्याणासाठी सांगीतलेल्या उपदेशावर आधारीत मिलिंद राजाने भंते नागसेनास विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे

१) तो आपल्या घरातुन बाहेर गेल्यावर पुष्कळ खाण्यापिण्यासाठी मिळते. त्याच्या सोबत पुष्कळ जीवन जगतात. जे की ,मित्राच्या सोबत द्रोह करत नाहीत.
२) तो ज्या ठिकाणी जातो ,त्या सर्वामध्ये पुजनिय होतो.
३) त्याला चोर त्रास देत नाहीत. राजा त्याचा अनादर करीत नाहीत. तो सर्व शत्रुवर विजय मिळवतो.
४)प्रेम पुर्वक आपल्या घरी येत असतो. सभेमध्ये त्याचे स्वागत होते .भाऊबंदामध्ये तो चांगला मानला जातो.
५) तो सत्कार करून सत्कार घेतो. गौरव करणारा गौरवणीय होतो.त्याची यश किर्ती चारही बाजुला पसरत असते.
६) पुजा करणाऱ्याची पुजा होते.तसेच ते चमकत असतात. देवता समान सुशोभित होतात. शोभेन मुक्त होतात.
७) त्याचे पशु प्राणी वाढतात शेतातील टाकलेले पीक वाढते पुत्रासाठी फळ प्राप्त होत असते.
८) घाटी, पर्वत अथवा झाडामध्ये पडलेली व्यक्ती पडुनही सहारा घेत असते.
      ज्या प्रकारे मजबुत मुळ्याचे मोठे ,वडाच्या झाडाला मालुवा वेल काहीही बिघडवु शकत नाही.त्या प्रकारे शत्रु त्याला पराजीत करू शकत नाही.
                                 जाणिव जागृती अभियान
                                   जागे व्हा .. जागे करा

Comments

Popular Posts