नियतीशी करार
माझी लेखनी
मी आज नियतीशी करार करत आहे .
मला गद्दार म्हणले तरी चालेल ,
पण मी माझ्या लेखनीला कधीच गद्दार होवु देणार नाही.
मला षंढ म्हणले तरी चालेल,
पण मी माझ्या लेखनीला कधीच षंढ होवु देणार नाही .
मला किती ही झोप येवु दे ,
पण मी माझ्या लेखनीला कधीही झोपु देणार नाही.
मला दुनियाने कितीही पागल म्हणले तरी चालेल,
पण मी माझ्या लेखनी ने हे जग शहाणे करूनच सोडणार आहे.
विजय नामदेव त्रिभुवन
वेळ ११.४५ pm
दि. १९/१ /२०१८
Comments
Post a Comment