राणी पदमावती फिल्म मधुन आपण काय शिकावे?

राणी पदमावती या ऐतिहासीक फिल्म मधुन शिकण्यासारखे काही  

१) धर्मगुरू बद्दल असणारी अंधश्रध्दा . व धार्मिक पगडा किती खतरनाक असतो. ब्रम्ह हत्या करणे पाप असा राजा रतनसिंगचा असलेला विश्वास स्वतःचा घात करून घेतला. छत्रपती शिवाजी महाराजाना अफजल खानाचा वकिल कृष्णा भास्कर कुलकर्णी ने त्याच्यावर वार केला तर त्याचे मुडके छाटले होते.

२) भारतीयानी ""अतिथि देवो भवो "" याचाही वेळ काळ पाहुन या मुल्याचे पाळन करायला हवे . ह्याच्यावर डोळे लावुन यावर विश्वास ठेवल्या मुळे भारत 5000 वर्षा पासुन गुलाम आहे युरेशियन ,मुघल ,पोर्तुगीज ,डच इंग्रज याना सुरूवातीला अतिथि देवो समजुन स्वतःला पाताळात गाडुन घेतले.आता ही विदेशी गुंतवणुक खुप गोड लागत आहे पण भारत जेव्हा आर्थिक गुलाम होईल तेव्हा कळेल.

३) राजा रतनसिंग जेव्हा दुसऱ्या राजपुत राज्याना मदतीसाठी आव्हान करतो तेव्हा कोणीच त्यांना मदत करत नाही.त्याना असे वाटत नाही की आपल्यावर ही असाच प्रसंग येईल.

४) राणी पदमावतीनी केलेला गनिमी कावा 800 दासी सोबत राजा रतनसिंग ला दिल्लीला केलेला प्रवेश व त्यात १००℅ यश भेटते.  त्यात ८०० दासी नसता तर सैनिक असतात.पतीला जेव्हा अल्लाहुद्दीन खिलजी पकडतो तेव्हा राणा पदमावती रडत बसत नाही . शौर्य वेळ काळ पाहुन दाखवावे लागते.

५) सतीप्रथा भारतीय संस्कृतीला लागलेले वाईट ग्रहण होते.पण या प्रसंगात घेतलेला निर्णय हा काही धार्मिक भावनेतुन घेतलेला नव्हता तर समोरच्याचाच पराभव करण्यासाठी केलेले बलिदान होते. काही पुरोगामीचा राणी पदमावती सती गेल्या म्हणुन त्याच्या कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो.त्यानी तो बदलु नये. ही लढाई अल्लाहुद्दीन काही राज्य मिळविण्यासाठी लढत नव्हता तर फक्त हवस पुर्ण करण्यासाठी केली जात होती. जर राज्य गेले  असते तर ते परत मिळवता आले असते पण अब्रु  ही परत मिळवता आली नसती.भारतीय इतिहासात खुप जनानी  दुसऱ्याच्या हातुन मरण पतकरण्या पेक्षा खुप जनानी स्वतःच्या हातानीच मरण पतकारलेले आहे . उदा. चंद्रशेखर आझाद

६) सिंघल राज्याची राजकुमारी पदमावती ही बौध्द उपासिका आहे. फिल्मच्या सुरूवातीला लेणी व बुध्दाच्या मुर्त्या व उपासना करताना  दाखवले आहे.

७) राजा रतनसिंगला कैद केल्या नंतर तो राणा  पदमावतीला दिल्ली बोलविण्यासाठी निरोप पाठवतो .राणी  पदमावती कित्ती मुद्दसी राजकारणी होत्या ह्या प्रसंगावरून दिसुन येते. त्या तिन अटी ठेवत्यात अट १)मी 800 दासी सोबत डोलीत  येईल त्यात शुर सैनिक असतात अट २) मी अगोदर राजा रतनसिंगला भेटेल त्याना कैदेतुन मुक्त करावे
अट ३) ज्याच्या मुळे हे सर्व रामायण घडले तो कळीचा नारायण, मनुवादी धर्मगुरू त्याचे मुंडके मेवाडला पाठविल्या शिवाय मेवाड मधुन डोली निघणार नाही. आणि अल्लाहुद्दीन एका क्षणाचा ही विचार न करता तिन्ही अटी मान्य करतो व त्या धर्म गुरूचे मुडके मेवाड ला पाठवतो।
धर्मगुरूचे मुडके कापलेले या फिल्म मध्ये दाखविले म्हणुनच काही मनुवाद्याची ढाल नाक कापण्याचे फरमान काढत होते. व फिल्मला विरोध करत होते.

८) भारतातील विविध जाती व त्याच्या सैनिकी  रेजिमेण्ट  मराठा (एक मराठा लाख मराठा ) सिख (तर त्याच्या शौर्यासाठी प्रसिध्द आहे ).महार ५०० महार विरूध्द २८००० पेशवे भीमाकोरेगाव . शिवरायाचे मावळे किती निष्टावंत होते त्याच प्रकारे राजपुताचा ईतिहास माहित झाला. कभी किसीको पिट नही दिखाते. अगर गर्दन भी तुट गई तो गर्दन नही झुकाते .

९) सत्तेचा गर्व झालेले इतिहासात जनतेला त्रास देणारे व जनतेला उल्लु बनविणारे सत्ता असताना जरी स्वतःला शुर ,हिरो समजत असले तरी जनता त्याना त्याची अवकाद दाखवतेच . त्यावेळेस जरी ते स्वतःच स्वतःचा इतिहास लिहत असेल तरीही इतिहास त्याची योग्य नोद घेतो व पत्त्याच्या पाना सारख्या त्याची सत्ताही नष्ट होत्या

१०) सत्तेची नशा चढलेल्या व जग जिंकण्याची भाषा करणाऱ्या खिलजी राणी पदमावतला मिळविण्यासाठी काहीही करण्यासाठी तयार असलेला खिलजी राणी पदमावती समोर काहीच करू शकला नाही.
   
   सलाम या भारतीय संस्कृतीत रूजलेल्या या मुल्याला , शील जपणाऱ्या त्या राणीला.

       विजय नामदेव त्रिभुवन
        मो. नं. 8605895244

Comments

Popular Posts