मराठी लढत आहे.
मराठी लढत आहे,
मराठी लढत आहे
एकटीच लढत आहे.
पाषाणावरती उगवुनी
दाखवत आहे.
मराठी लढत आहे ,
बाजी बादंल सारखी एकटिच खिंड लडवत आहे.
यशंवत घोरपडे सारखी किल्ला चढत आहे.
मराठी लढत आहे ,
एक हात तुटला तरी
तानाजी सारखी लढत आहे.
सुर्याजी सारखी सर्व दोऱ्या कापत आहे.
मराठी लढत आहे
तिच्या साठी लढणाऱ्या ढोंगीणा ओळखत आहे.
मराठी लढत आहे ,
सैराट होवुन झळकत आहे.
नटसम्राट होवुन चक्रवती सम्राट होणार आहे.
मराठी लढत आहे,
चला हवा येवु द्या होवुन
सर्वाना हसवत आहे.
नाम म्हणुन स्वतःच्या लेकराला जगवीत आहे.
मराठी लढत आहे,
डफावरती हात ठेवुनी रशियात पोवाडे गात आहे.
हातात गोटे घेवुन किर्तन करत आहे.
मराठी लढत आहे,
लिहिलेल्या गाथा पाण्यात बुडवतात ,म्हणुन सर्वाच्या मना मनात नांदत आहे.
ईथले मनुवादी नालंदा, तक्षशिला जाळतात म्हणुन ती या चार भिंतीच्या बाहेर पडत आहे
मराठी लढत आहे,ईथे स्त्रीला सती म्हणुन जाळतात. पडद्या आड ठेवतात म्हणुन पडद्या बाहेर पडत आहे.
मराठी लोकांच्या जिवावर राज्य मिळवुन संस्कृत चे गोडवे गाणाऱ्याना कडु घास भरवत आहे.
मराठी लढत आहे,
भारतातील मनुवादी ईतिहास बदलतात म्हणुन संविधानात इंग्रजीच्या रुपात लपत आहे.
कवि: विजय नामदेव त्रिभुवन
मुकुंदवाडी औरंगाबाद
मो नं . 8605895244
Comments
Post a Comment