दिपक नरवडे सर यांच्या विद्यार्थ्याचे सांत्वन

दिपक नरवडे सर यांच्या शाळेतील विद्यार्थ्याचे सांत्वन

कालकथित : दिपक नरवडे सर यांची शाळा जिपप्राशा खांडीवस्ती गणोरी केंद्र फुलंब्री यांच्या शाळेतील विद्यार्थ्याचे सांत्वन करण्यासाठी फुलंब्री केंद्राचे केंद्र प्रमुख आदरणिय शिवाजी साळवे ,राम सुरवसे , महाजन सर ,अकुंश म्हस्के, विजय त्रिभुवन यांनी भेट दिली.
        जे सर रोज शाळेत येतात ते  आता का येत नाही?
सर कुठे गेले?
दिपक सरांची रोज सारखी वाट बघणारी चिमुकले ,
सरांना कधी कधी थोडा फार उशिर होत असेल पण आज एवढा उशिर का?
सर का येत नसेल.
        सरांना कुठली अशी ट्रेनिग लागली ? जी आणखीन संपली का नाही.
सर कोणत्या मिटिंगला गेले?
जी मिटिंग आणखीन संपली का नाही.

या सर्व प्रश्नाचे उत्तर केंद्रप्रमुख शिवाजी साळवे ,सुरवसे सर यांनी देण्याचा प्रयत्न केला.

जीवन हे फुलासारखे असते सकाळी फुल उमलते ते उमललेले फुल सर्वाना आनंद देते व दुपार नंतर फुल कोमजायला लागते कोमजल्या नंतर ही फुल सुंदर असा सुंगधच देतो. फुल ज्या माणसाने तोडले त्या  तोडणाऱ्याच्या हातालाही सुंगधच देतो त्याच प्रकारचे दिपक सरांचेही जीवन होते....

मुलाना,"" घरोघरी मोहऱ्या मागणाऱ्या त्या किसा गौतमीची बोधकथा सांगण्यात आली . माझ्या मुलाला जिवंत करा अशी विनंतीती सिध्दार्थ गौतम बुध्दाला करते , ते सांगता की ज्या घरी आता पर्यन्त कोणाचाच मृत्यृ झाला नाही तेथुन तु मुठभर मोहऱ्या घेवुन ये ती दारोदारी फिरते पण कोणतेच असे घर सापडत नाही मग तिच्या डोक्यात प्रकाश पडतो. जीवन हे नश्वर आहे अनित्य आहे ."" nothing is permanent in this world "" 

   तुम्ही खुप खुप  चांगले वागा खुप खुप अभ्यास करा हीच दिपक सरांना खरी श्रध्दांजली आहे.
         शब्दांकन: विजय त्रिभुवन

Comments

Popular Posts