संपर्क साधना एक अनोखी विद्या

*संपर्क साधना*
      *एक अणोखी विद्या*

तथागत गौतम बुध्दाने शिकवलेली. ही विद्या मला त्रिरत्न बौध्द महासंघाच्या औरंगाबाद येथील ऑक्टोबर महिन्यातील  शिबिरात मला शिकायला भेटली . आणि माझ्या आयुष्यात खुप परिवर्तन होत आहे. मला हे सांगायला खुप उशिर झाला त्याबद्दल मी माफी मागतो. आपल्याला आवडलेली गोष्ट किंवा ऐकलेली माहिती सतत कोणाला तरी सांगत राहायचे नाहीतर ती तुमच्याही स्मरणात राहत नाही दुसऱ्याना सांगीतल्यामुळे त्या ग्यानाचा तुम्हालाच जास्त फायदा होतो. ती गोष्टीचा तुम्ही पुन्हा सराव करतात किंवा स्मरणातुन जात नाही त्यामुळे असे म्हणतात , ""ग्यान दिल्याने ग्यान वाढते""
लेट पण थेट.

मला भारतातील व जगातील ज्यावेगवेगळ्या  बौध्द संघटना आहे त्याचा अभिमान वाटतो कारण प्रत्येक संघटना बुध्दांनी सांगितलेले पंचशिल, पारमिता, अष्टांगिक मार्ग याचे आचरण कसे करावे हेच शिकवतात. माणसाला माणुस बनविण्याचाच प्रयत्न करतात.

     तथागत गौतम बुध्दांनी मानवाला निसर्ग नियमावर आधारीत जो धम्म आहे तो सतत ४५ वर्ष अथक प्रयत्न करुन सांगितला . कोणाला धम्म हा गोष्ट सांगुन सांगितला ,प्रश्न विचारून ,कोणाला मोहऱ्या आणण्यास सांगितले, तर कोणास झाडाची पाने तोडायला लावली, तर कोणाला पाण्यामध्ये मडके फोडायला लावले ,तर कोणाला झाडाचे निरीक्षण करायला लावले, तर कोणाला विपश्यना शिकवली, तर कोणाला फुलाकडे बघायला सांगितले तर कोणाला मेणबत्ती ,अगरबत्ती कडे बघायला सांगितले . ई त्यांनी अश्या विविध मार्गाने निसर्गातील नियमाशी मानवी जीवनाशी सांगड घालुन दिली. निसर्गामधील जे विविध प्रकारचे बदल होतात तसेच मानवाच्या आयुष्यात ही बदल होत असतात. मानव त्या बदलाला स्विकारायला तयार नसतो त्यामुळे तो दु:खी होतो. मानवी जीवनात सुख दुख हे चक्र अविरत चालु राहते त्यामुळे सुखात अहंकार करू नका व दुःखात रडु नका.मध्यम मार्गाचा स्विकार करा.
   बुध्दाचा धम्म हा आत्मा, परमात्मा, स्वर्ग ,नर्क ,पुर्नजन्म  अश्या गोष्टीबद्दल काहीच भाष्य करत नाही .त्यामुळे मानवाचे कल्याण होणार नाही पण बुध्दाचा धम्म हा मानवा मानवातील संबंध,मानवाचे मन याबद्दल नक्कीच मानवाला कल्याणकारी मार्ग दाखवतो व त्यामार्गावर आपल्याला, स्वतःलाच चालावे लागेल, प्रयत्न करावे लागेल..
   तर संपर्क साधना मध्ये मानवा मानवात सलोख्याचे संबंध निर्माण होण्यासाठी , एकमेकाबद्दल असणारी घृणा दुर करण्यासाठी, एकमेकातील मानवाची ओळख होण्यासाठी तसेच आपण फक्त समोरील व्यक्तीचे बाह्यरूप बघुन त्याबद्दल अनुमान करू लागतो,
काहीना गोऱ्या रंगाचा अहंकार झालेला असतो तर कोणाला काळा रंगाची  अँलर्जी असते , कोणाच्या नाकावर ,कानावर कपाळावर आपण हसतो .पण संपर्क साधना करताना आपल्याला या साऱ्या निर्थक गोष्टीवर लक्ष न देता समोरच्या व्यक्ती समोर बसुन  एकमेकाच्या डोळ्यात बघायचे.  हा एक प्रयोग आहे . समोरच्या डोळ्यात बघायचे तुम्हाला हसु येत असेल तर हसा रडु येत असेल तर रडा. समोरच्या व्यक्ती च्या डोळ्यात बघितल्या वर आपला संपर्क त्या मानसाच्या मनाशी येतो . आपल्याला त्याच्या बद्दल करूणा जागी होते त्याच्या मनातील दुख आपल्याला दिसु लागते तो व्यक्ती वरून जरी हसत असला तरी आतुन तो किती दुखी आहे हे आपल्याला जाणवते व आपला त्या व्यक्तीशी घनिष्ट जिव्हाळ्याचे संबंध स्थापित होतात.पती पत्नी चे संबंध शारिरीक असतात पण अश्या प्रकारचे भावनीक संबंध खुप कमी जनामध्ये असतात.मला हे शिबिर चालु असताना हे रिकामे उद्योग वाटले पण नंतर मला वरिल सर्व गोष्टी माझ्या सोबत घडल्या मला समोरील व्यक्ती कडे बघणे किळसवाणे वाटत होते त्यांनतर मी तिथे दिलेल्या सुचनाचे पालन करुन त्या व्यक्तीच्या डोळ्यात पाहत होतो बाकी जनाचे हसी मज्जाक चालु होते.मला जादु झाल्यासारखेच जानवले माझ्या मनातील निर्थक भावना निघुन गेल्या व त्या व्यक्ती बद्दल करूणा ,प्रेम , आपुलकी निर्माण  झाली.गौतम बुध्द ,गाडगेबाबा असे महापुरूष हे रोग्याची सेवा करतात त्यात त्याना काहीच किळस वाटत नाही.
बुध्द समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात बघुन मानसशास्त्रीय पध्दतीने त्यांच्या सर्व समस्या ,दुख ,प्रश्न समजुन घ्यायचे. व त्याला मार्गदर्शन करायचे त्यामुळे काही जन बुध्दावरती आरोप लावत होते की भगवान बुध्द संमोहन करतात.ते संमोहन नव्हते तर संपर्क साधना होती.
मुलाखत घेताना आपले सर्व हावभाव चेक करतात. आपण समोरच्या व्यक्तीच्या डोळ्याकडे बघण्याचीही खुप जनाची हिंमत होत नाही.
स्टेप्स :२
     त्यानंतर समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात बघुन  एकच वाक्य खुप वेळेस सांगायचे उदा . मासा पाण्यात पोहत आहे. समोरचा म्हणेल हो , परत सांगायचे मासा पाण्यात पोहत आहे तो म्हणेल हा . असे ५, १० मिनिट विचारायचे . यामुळे आपल्यात सहनशक्ती निर्माण होते . जर दुसरी कडे असे घडले तर आपल्याला लगेच राग येतो पण संपर्क साधनेत असा सराव केल्यामुळे आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवु शकतो ल मानवा मानवात चांगले संबंध निर्माण होऊ शकतात.

          अप्रसिध्द कवी व लेखक
            विजय नामदेव त्रिभुवन
            मो.नं. 8605895244
              मुकुंदवाडी औरंगाबाद

Comments

Popular Posts