तो मीच आहे
तो मीच आहे......
झोळी फाटत असतानाही ,
आणखिन सोन्याच्या मोहरा मागणारा तो भिखारी ,
तो मीच आहे...
""लांडगा आलारे आला "" असे जोरात ओरडुन लोकांची गंमत बघणारा तो मेंढपालही ,
तो मीच आहे...
छोट्याश्या वेलीला इतके मोठे फळ का ? व मोठ्या झाडाला इतके छोटे फळ का दिले ? असे देवाला पत्र लिहिणारा ही ,
तो मीच आहे...
शर्यत सोडुन गाजरे खात बसणारा ससाही ,
तो मीच आहे...
मामाने दिलेले पैसे हातात ,दुध खिश्यात व बकरी डोक्यावर आणणारा तो बाळु ,
तोही मीच आहे.....
पाण्यातल्या कुत्र्याच्या तोंडातली पोळी हिसकुन घेण्यासाठी भों -भों
करणारा तो कुत्रा
तो मीच आहे....
सर्वानी मिळुन मिसळुन केलेली खीर खाऊनही घागरी वर उभा राहुन "बुडबुड घागरे ,जर मी खीर खाल्ली असेल तर "" अशी म्हणणारी ती मांजरही मीच आहे......
कवि / लेखक
✍विजय नामदेव त्रिभुवन
एन -२ बी २५/४
संघर्षनगर मुकूंदवाडी
औरंगाबाद
मो नं. ८६०५८९५२४४
Comments
Post a Comment