Thanks Jio #thanksJio
#thanksJio
काही दिवसापुर्वी एका किराणा दुकानाच्या तिथे उभा होतो . तेवढ्यात एक बिन ओळखीच्या मावशी आल्या . त्या म्हणाल्या , "बँलेन्स द्या दहा रूपयाचे"" लगेच मला माझे मागचे सर्व दिवस आठवले आणि अंतकरणातुन आवाज आला thanks Jio .
तो दुकानदार म्हणाला अकरा रूपये लागेल त्यानी एक रुपया सुट्टा दिला रिचार्ज पेपर घेतला . मी म्हणालो मावशी माझ्या फोन वरून बोलुन घ्या तुमच्या पाहुण्या सोबत मला फ्रि आहे. तर त्या म्हणाल्या मोबाईल घरी आहे त्यातच नंबर आहे मला पाठ नाही . मी काही वेळा साठी स्तंभच झालो. किती लुटले यार आता पर्यन्तच्या कंपन्यानी भारतातील गरीब, शोषित जनतेला .दहा रुपयाचे बँलेन्स ७ रुपये भेटायचे त्यात बोलायचे .किती व कसे हा मोठा प्रश्न होता ? त्या सात रुपयाच्या बँलेन्स मधुनही लुट व्हायचे कोणतेही कारण नसताना बँलेन्स कट व्हायचे . बळजबरी कोणतीही सेवा चालु करून द्यायची व त्याचे पैसे कट करायचे . थोडी सुध्दा माणुसकी दाखवली नाही . ३६५ दिवसा पैकी १ दिवस तरी फ्रि द्यायचा ना . किती अप्पल पोटे होतात .स्वतःचाच विचार करणारे. ""आधी पोटोबा मग विठोबा'' अशी म्हण आहे .पण तुम्ही पोटोबाच करत बसले. थोडा तरी विठोबा करायचा ना .. मँसेज साठी एक रुपया कधी दिड रुपया चुकुन गेला तरी पैसे कट व्हायचे . रोमिंग चार्ज वेगळा . नेट बँलेन्स टाकायचे कधीच YouTube सुरू करायचे धाडस केले नाही. चुकुन ओपन व्हायचे तर लगेच नेट बँलेन्स ही संपायचे व फोन मधील टॉक टाईम ही . खरेच किती दयावान होते तुम्ही ग्राहकांना टॉक लोन द्यायचे . .
YouTube, google हे आधुनिक न्यानाची विद्यापिठेच आहे . मनुस्मृतीने ज्या प्रकारे क्षत्रिय , वैश्य व शुद्राना ग्यान नाकारले त्याच प्रकारे तुम्हीही आमच्या साठी ग्यानाचे दरवाजे बंद केले होते . ते जियोने खुले केले . ते दरवाजे Bsnl ने उघडायला हवे पण सरकार हे भांडवलदाराचे दलाल आहे . ईथले किल्ले सुध्दा आता गहाण आहे.
काही दिवस तर मी युनिनॉर, डोकोमो एयरसेल यापैकी दर तीन महिन्याला एक सिम विकत घ्यायचे त्यात खुप सारे मोफत बँलेन्स यायचे व कॉलिग रेटही कमी असायचा. Bsnl च्या कृषी प्लँन ने थोडी संजीवनी दिली होती पण तीही ड्युबलिकेट निघाली . जशी खताची बियाणे निघता तशी..
या वोडाफोन , आयडीया Airtel कंपन्याचा माजोरा पणा आणखीन काही कमी झाला नाही. आणखीन ही फसवायचे धंदे चालुच आहे .. जियो सारखे प्लँन काढतात पन रेंजही राहत नाही व नेट ही चालत नाही. जियो ने 4 जी नेट दिले कॉलिग, Sms फ्रि दिले तेही ६ महिने. आणि आता जियो ने २८ दिवसासाठी ५१ रुपयात मोफत अनलिमिटेड कॉलिग व SMS सुविधा दिली आहे बाकी कंपन्या आणखिन लुटायसाठीच टपल्या आहे.
""काळ बदलला आहे आटा कम और डाटा ज्यादा चाहिए ""
त्यामुळे #thanksjio
अप्रसिध्द कवी / लेखक
✍ विजय नामदेव त्रिभुवन
मो.नं. 8605895244
संघर्षनगर मुकूंदवाडी
औरंगाबाद
Comments
Post a Comment