बांभुळ
*बांभुळ*
होती एक बांभुळ ,
होती एक बांभुळ,
आमच्या गावाकडच्या मळ्यात.
गावाकडे जाताना लांबुनच ती दिसायची.
ती दिसल्यावर घर आल्याचा आनंद व्हायचा.
ती दिसतास पावलांना चालायचे
बळ मिळायचे .
शेताच्या बांधावर उभा राहुन ,
शेताच्या सिमेची सैनिका सारखी
रक्षण करायची .
मालकाच्या शेताचा बांध कोरू नये कोणी,
म्हणुन खंबीर उभा रहायची .
छोट्याश्या तिच्या सावलीतच ,
आम्हाला सर्वाना सामावुन घ्यायची ,
तिचीती प्रेमळ छाया आम्हाला
ती भर उन्हातही द्यायची .
तिचे काटे कधी आमच्या पायात घुसलेच नाही,
ती आमच्या शेताची ओळख होती,
ते आम्हाला त्या वेळेस कळलेच नाही.
✍ विजय नामदेव त्रिभुवन
मो. नं.८६०५८९५२४४
मुकूंदवाडी औरंगाबाद
Comments
Post a Comment