लग्न करताना मध्यस्थी पडावे की नाही

लग्न जमविताना मध्यस्थी पडावे की नाही ???

लग्नाच्या जोड्या अगोगदच देवाने बनवलेल्या असतात. तर सर्व जोड्या एकाच जातीतील एकाच धर्मातील असतात. यावरून असे समजावे की देव ही जातीवादीच आहे.  जोडी काही वरुन बनुन येत नाही . रबने बनादी जोडी फिर क्यु तोडी . सर्व आपल्या विचारावर अवलंबुन असतात.आपण जसा विचार करतो तसेच व्यक्ती आपल्याला भेटतात तश्याच  घटना आपल्या आयुष्यात  घडतात.
                 माणुस माणसापासुन दुरावत चालला आहे . त्यामुळे लग्न जमविण्यासाठी शहरी भागात खुप अडचणी येतात. लोकांना आपले नात्यातले समाजतले  लोक आपल्या शेजारी , ऐरियात राहतात हे ही माहित नसते. त्यामुळे वधुवर परिचय मेळावे भरावे लागतात. किंवा खुप साऱ्या वेबसाईट बनत आहे.. पुर्वी खुप सारे लोक लग्न जमविण्यासाठी  विन अपेक्षा मध्यस्थि पडायचे . पण आता असे  लोक खुप कमी झाले आहे . काहीनी तर व्यवसायच सुरु केला आहे . माणसाने माणुसकी टिकुन न ठेवल्यामुळे आताच्या काही मध्यस्थिचे खुप लाड करावे लागतात.  मानधन द्यावे लागते.
             पुर्वीचे काही मध्यस्थी कोणतेही अपेक्षा न ठेवता निस्वार्थी भावनेने काम करायचे . त्यातील काहीजन  तर  ज्याना चांगले स्थळ भेटले तर ते म्हणायचे आमच्या नशिबामुळे आम्हाला चांगले स्थळ भेटले. लग्नानंतल  मध्यस्थी घरीजरी आले तर त्याना साधा चहाही विचारात नाही . आणि जर काही दिवसानंतर वादविवाद झाले तर मध्यस्थीच्या घरी जावुन त्याला भांडायला ही कमी करत नाही . तर ईथुन पुढे मध्यस्थीना कोणीही दोष देवु नये. नाहीतर लग्न जमविण्यासाठी कोणाचीच हिंमत होणार नाही. आणि काहीना गरीब लोकाची अँलर्जी असते . त्यामुळे ते आपल्या
पाहुण्यातल्या लोकांना किंमत देत नाही . अायुष्यात अापल्याला कोण कुठे उपयोगी पडेल हे सांगता येत नाही .त्यामुळे प्रत्येक माणसाचा आपण आदर करायला हवा.
      
            अप्रसिध्द लेखक / कवी
             विजय नामदेव त्रिभुवन
            मो नं.8605895244

Comments

Popular Posts