बौध्द जीवनमार्ग कोणता आहे ???
बौध्द जीवनमार्ग कोणता आहे??
दारिद्रय हे दुःखाचे उगमस्थान आहे . परंतु दारिद्रय नाशाने सुख लाभेलच असे नाही .
सुख लाभते ते उच्च राहणीवर अवलंबून नसुन ते उच्च संस्कृतीवर अवलंबून आहे. हा बौध्द जीवनमार्ग आहे.
खोटे बोलु नये . खोटे बोलण्यास दुसऱ्याला प्रवृत्त करू नये.खोटे बोलण्याच्या कृत्याला संमती देऊ नये . सर्व प्रकारचे असत्य भाषण टाळावे . तथागत जसे बोलतात तसे वागतात. तथागत जसे वागतात तसे बोलतात. ते यथाभाषी तथाकरी आणि तथाभाषी असल्यामुळे त्यांना तथागत म्हणतात.
हा बौध्द जीवनमार्ग आहे.
"भगवान बुध्द आणि
त्यांचा धम्म"
✍लेखक: विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*जाणिव जागृती अभियान*
*जागे व्हा जागे करा*
Comments
Post a Comment