सत्तेची नशा

माझी ही नवीन कविता

काही नेते, सत्ताधारी, पदाधिकारी बॉस  यांना सत्तेची खुर्चीची नशा चढते . तळ्यातल्या बेडका सारखे अशे फुगतात अशे फुगतात आणि स्वतःला सिंघम राजे महाराजे समजतात.

       "" सत्तेची हवा ""

दिल्ली पासुन गल्ली पर्यत

जाती नेत्याच्या डोक्यात हवा

यावर नाही कोणतीच दवा

कार्यकर्त्याच्या जिवावर होते हे मोठे

नंतर त्यानाच  समजतात हे लोटे आणि  गोटे

सत्तेच्या नशेने होता हे सिंघम

होतो त्याच्या ऐकेदिवशी छिं दम

स्वतःला समजतात  छत्रपती पेक्षा श्रेष्ट

महापुरूष ही वाटतात स्वतः पुढे यांना कनिष्ट

बँनरवरिल स्वतःचे फोटो असतात  मोठे मोठे

त्यामुळे महापुरूषही वाटतात त्याना छोटे छोटे

काही नेते स्वतःला समजतात दादा घरी नाही याच्या कांदा

काही समजतात स्वतःला भाऊ

स्वतःच्या मुलाबाळासाठी नाही खाऊ.
   

    कवि : विजय नामदेव त्रिभुवन
       मुकुंदवाडी औरंगाबाद
        मो नं. 8605895244

Comments

Popular Posts