श्रामणेर , भंतेजी व सर्व उपासकासाठी चे विनय

*परिमण्डलवग्गो सेखीय*

सेखीय म्हणजे शिकण्यायोग्य विनय. हे तथागत गौतम बुध्द यांनी श्रामणेर ,भंतेजी यांना सांगितले आहे . ह्या नियमाचे उपासकांनी ही पालन केल्यास काही नुकसान होणार नाही .

१) चीवर परिमंडल करून घेईन अशी शपथ ग्रहण करावी .
२) चीवर परिमंडल करुन घरामध्ये बसेन अशी शपथ ग्रहण करावी .
३) गृहस्थांच्या घरांमध्ये चांगल्या प्रकारे शरीराला आच्छादित करून बसेन.
४) घरामध्ये संयमाने जाईन व संयमाने बसेन असा नियम करावा .
५) घरात दृष्टी खाली ठेवुन व गावात  दृष्टी खाली ठेवुन जाईन अशी शपथ ग्रहण करावी
६)  चीवर उडवित घरात जाणार नाही  व बसणार नाही .
    
        *उज्जग्घिकवग्गो*

१) घरामध्ये मोठ्याने हसत हसत अथवा अठ्ठहास करत बसणार नाही व  जाणार नाही .
२) घरामध्ये मौन ठेवुन जाईन व मौन ठेवुन बसेन
३) घरामध्ये शरीर हलवित जाणार नाही व शरीर हलवित बसणार नाही अशी शिक्षा शपथ करावी .
४) घरामध्ये हात व डोके  हलवित जाणार नाही अशी शिक्षा शपथ करावी .

        *खम्भक वग्गो*
१) घरामध्ये कमरेवर हात ठेवुन जाणार नाही व बसणार नाही .
२) घरांमध्ये डोक्यावर पांघरून जाणार नाही व डोक्यावर पांघरून बसणार नाही
३) घरामध्ये टाचावर करून जाणार नाही . पालथी मांडी घालुन बसणार नाही  अशी शपथ ग्रहण करावी
४) पिंडपात ( भिक्षा ) सत्कार पुर्वक ग्रहण करीन व भिक्षान्न पात्रावर लक्ष ठेवुन ग्रहण करीन .मात्राच्या नुसार ( लागेल एवढेच ) वरण घेईन .पात्र भरून न जाईल अशा प्रमाणाने पिंडपात ग्रहण करीन अशी शपथ ग्रहण करावी.

           विजय नामदेव त्रिभुवन
         जाणीव  जागृती अभियान
           जागे व्हा जागे करा.
          मो .नं. ८६०५८९५२४४

Comments

Popular Posts