धम्मोपदेश कुणाला करू नये
धम्मोपदेश कोणाला करू नये ?
तथागत गौतम बुध्द यांनी त्याच्या भिक्षु संघास "" बहुजन हिताय बहुजन सुखाय "" या साठी सर्व जगात भ्रमण करून धम्माचा उपदेश द्यायला सांगितले होते . पण धम्म उपदेश कुणाला करू नये यासाठीही सुचना दिल्या होत्या . त्यामुळे ज्याला धम्माची गरज होती त्या सर्व व्यक्तीना धम्माचा लाभ झाला .
तथागत बुध्दांनी सर्व मारसेने चा पराभव केला होता . सर्व प्रकारच्या भयावर मात केली होती . तथागतामध्ये इतकी मैत्री करुणा होती त्यामुळे त्याना कुणाचीच भिती वाटत नव्हती . पण एका गोष्टीलाही तथागत घाबर होते . ती गोष्ट मुर्ख व्यक्ती . मुर्ख व्यक्तीला धम्म उपदेश करताना आपला वेळ बुध्दी श्रम सर्व काही वाया जाते .
सध्या भक्त मंडळीना आपण उपदेश देतो . पण त्याच्यावर त्याचा काहीच फरक पडत नाही . त्यामुळे धम्मोपदोश कुणाला करावा कुणाला करू नये .याविषयी आपल्याला माहिती असायला हवी
१ ते ४)छत्री हातात असलेल्या निरोगी व्यक्तीस व हातात काठी असलेल्या निरोगी व्यक्तीस , हातात तलवार , आयुध किंवा शस्त्र असलेल्या निरोगी व्यक्तीस धम्म उपदेश करणार नाही अशी शपथ ग्रहण करावी.
५ ते ६) पादुका ,वाहन ,बुट घातलेल्या निरोगी व्यक्तीस धम्म उपदेश करू नये अशी शपथ ग्रहण करावी .
७ ते ११) वाहनावर बसलेल्या निरोगी व्यक्तीला , बिछान्यात असलेल्या ,पालथी मांडी मारून बसलेल्या निरोगी व्यक्तीला , डोक्याला वस्त्र गुडाळलेल्या निरोगी व्यक्तीस , डोक्यावर पांघरून घातलेल्या निरोगी व्यक्तीला धम्म उपदेश करणार नाही अशी शपथ ग्रहण करावी .
१२ ते १६) आपण स्वतः जमिनीवर बसुन आसनावर बसलेल्या निरोगी व्यक्तीला , आपण स्वतः उभे राहुन बसलेल्या निरोगी व्यक्तीला , आपण स्वतः पाठीमागे पाठीमागे जात असता पुढे जाणाऱ्या निरोगी व्यक्तीला धम्म उपदेश करू नये अशी शिकवण ग्रहण करावी .
१७) आपण स्वतः रस्त्याच्या बाहेर चालत असता रस्त्याने चालणाऱ्या निरोगी व्यक्तीला धम्म उपदेश करणार नाही अशी शपथ ग्रहण करावी.
विजय नामदेव त्रिभुवन
जाणिव जागृती अभियान
जागे व्हा जागे करा
मो.नं. 8605895244
Comments
Post a Comment