बाय बाय मुंबई

By by Mumbai.मेहनत शिस्त, सहनशिलता , सहकार्य मुंबईच्या लोकाकडुन शिकावे . आयुष्यात किती दगदग , टेंशन , लोकल ची गर्दी गाड्याची गर्दी ,गरमीचा प्रॉब्लेम ,जागेची समस्या तरीही कधीच रडणार नाही कुणालाही सांगणार नाही. नाहीतर आम्ही ट्रँक्समधील बस मधील गर्दी तेल मिठ लावुन महिनाभर तेच सांगणार.
    ४ दिवस मुंबईत राहिलो खुप गर्दीत फिरलो पण एक सुध्दा अँक्सिंडट बघायला भेटला नाही.साधा किरकोळ अपघात सुध्दा नाही बघायला भेटला. धक्क्यावरून भांडण नाही ना जागेवरून भांडणे . ना खिडकीतुन लोकल मध्ये बस मध्ये बसण्यासाठी रूमाल ठेवतात ना पेपर ठेवतात.
रोज लाखो प्रवासी येतात पण ते बाहेरचे वाटतच नाही .
पाचीपंक्वाणाची मेजवाणी मुंबईच्या वडापाव समोर फिकी आहे .
   वेळेचे  नियोजन कामाचे नियोजन मुंबई कराकडुन शिकावे.
अनेक संस्कृती, भाषा ,परपंरा  जपुनही जीवंत आहे  मुंबईची संस्कृती.
ना जातीचे भांडणे ना धर्माचे भांडणे , ना पक्षाचे भांडणे ,ना भाषेचे भांडणे ना गरिब श्रीमंतीचे भांडणे.
ना स्त्री पुरूष भेदभावाचे भांडणे.
    करोडोना जगविणारी मुंबई
    करोडोना घडविणारी मुंबई

Comments

Popular Posts