जॉर्ज वॉशिंग्टन यांनी लहानपणी ठरविलेल्या १० गोष्टी

जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष यांनी लहानपणी त्याच्या डायरीत दहा विचार  लिहुन ठेवले होते. त्यावर चालण्याचा निश्चिय त्यांनी केला होता.

१) तुम्ही जेव्हा काही माणसे एकत्र जमलेली असता, तेव्हा तुमच्या प्रत्येक कृतीतुन तेथे हजर असलेल्या सर्वाविषयी आदर व्यक्त होत असलेला राहिला पाहिजे.
२) दुसरे बोलत असतील तेव्हा झोपु नका ; दुसरे उभे असतील तेव्हा बसु नका आणि तुमची पाळी येई पर्यत बोलु नका.
३) दुसऱ्यावर दूदैव ओढवेल असेल ,तर त्याचा आनंद झाल्याचे दाखवु नका - अगदी तो तुमचा शत्रु असला तरी !
४) तुमच्या अधिक गुणवत्ता असलेला माणुस दिसला ,तर तुम्ही असाल तेथेच थांबा आणि त्याला पुढची वाट मोकळी करून द्या .
५) चांगल्या माणसाच्या संगतीत रहा. दुर्वृत्तां बरोबर राहण्यापेक्षा एकटे असणेच अधिक चांगले .
६) ज्यांची सत्यता पडताळता आलेली नाही. अशा बातम्या पसरविण्यात रस घेऊ नका.
७) जे तुम्ही करू शकणार नाही ते स्वीकारूच नका ; पण जे हाती घ्याल ते मात्र पुरेच कराच.
८) जे समोर उपस्थित नसतील त्यांच्या बद्दल वाईट बोलु नका.
९) तुमच्या बोलण्या- लिहिण्यात कुणाचाही उल्लेख करताना त्याच्या पदव्या आणि त्या त्या ठिकाणच्या चाली रीती आवर्जुन लक्षात घ्या.
१०) अंतःकरणात सदसद् विवेकबुध्दीची ज्योत सतत तेवती ठेवा.

                                 संकलन
                              विजय नामदेव त्रिभुवन
                            मो .नं. 8605895244
                             मुकूंदवाडी औरंगाबाद

Comments

Popular Posts