दृष्ट मनुष्य कसा ओळखावा ? व जुगाराने मोहित होणाऱ्यावर येणारी संकटे

""भगवान बुध्द आणि त्यांचा धम्म "" या ग्रंथातुन  नंबर .०१

** जुगाराने मोहित होणाऱ्यावर येणारी संकटे **
१) खेळात जिंकला तर त्याचे सहकारी त्याचा द्वेष करतात
२) हरला तर द्रव्यनाशाबद्दल तो स्वतः शोक करतो.
३) त्याच्या जवळची नगदी संपत्ती व्यर्थ जाते.
४) न्यायालयासमोर त्याच्या शब्दाला किंमत उरत नाही.
५) त्याचे मित्र आणि सहकारी त्याचा तिरस्कार करतात.
६) लग्नासाठी त्याला कोणीच मागणी घालत नाही

** भगवान बुध्द आणि त्यांचा धम्म  "" या ग्रंथातुन नंबर .०२

*** दुष्ट मनुष्य कसा ओळखावा ???

१) दुष्ट मनुष्य न विचारताच दुसऱ्याचे दोष दाखवितो आणि त्याला दुसऱ्या बद्दल विचारले तर मग बघायलाच नको. तेव्हा तर तो दुसऱ्याचे दोष किंवा व्यंगे न लपवता रसाळपणे सांगु लागतो.

२) जो मनुष्य विचारले असता दुसऱ्याचे सद्गुण दाखवीत नाही. पुन्हा पुन्हा विचारल्यावरच तो दुसऱ्याचे गुण सांगतो.

३) तो मनुष्य विचारले असताही आपले दोष उघड करीत नाही मग न विचारता तर बोलायलाच नको.

४) असा ही मनुष्य असतो की ,जो विचारले नाही तरी आपल्या चांगल्या गोष्टी उघड करीत असतो विचारल्यावर तर सांगायलाच नको.

Comments

Popular Posts