मी पण एक कार विकत घेतली होती.

मी पण एक कार घेतली होती ?????

   खुप सारे हप्ते ,हप्ते चालु होते.
नविन कार घ्यायची म्हणले तर
पुन्हा एक नविन हप्ता .  *प्यार झुकता नही और हप्ता रूकता नही* त्यामुळे सेंकडहँन्ड कार घ्यायची ठरवली .
     शाळेत येता जाता खुप जनाच्या कार मध्ये येत होतो.
आलिशान कार पण ते Ac च लावत नव्हते मी मनातल्या मनात
म्हणाला AC लावतच नाही तर कश्याला घेतात Ac वाली कार
त्यामुळे म्हणालो कारमध्ये Ac
नसला तरी चालेल.
      खुप साऱ्या श्रीमंत व्यक्ती व चांगल्या ऐरियात राहणाऱ्या
व्यक्ती कडे मारूती ८०० गाडी
दिसायची त्यामुळे मला काहीच
वाटले नाही ती गाडी घ्यायला .
त्या वेळेस फक्त फोरव्हिलर गाडी
कडेच लक्ष जात होते . सर्वा
गाड्याबद्दल माहिती व्हायला लागली . .
      खुप जनाना सांगितले गाडी
घ्यायची आहे एखादी असेल तर सांगा . सगळे म्हणाले हो सांगतो .
पण कोणीच काही सांगीतले नाही . एका दिवशी डायरेक्ट
गाडी घरी आणली तर सर्व जन म्हणायला लागले अरे मला सांगायचे असते मी या
पेक्षाभारी व स्वस्त घेवुन दिली असती. मला थोडा पश्चताप
होयला लागला पण मी त्यातुन
थोडे सावरलो व मनाला धिर देण्यासाठी म्हणालो ईतक्या
दिवस कुठे गेले होते हे . ज्यावेळेस आपण त्याना विचारत होतो . त्यावेळेस कोणत्या बिळात
जावुन बसले होते .
हमेशा भनभन चालु राहायची
खुप महाग पडली काहीच
परवडली नाही. आणि त्याना
गरज पडल्यावर ही गाडी खुशाल
घेवुन जायचे. मागायला ही थोडे
फार काही वाटत नव्हते . चांगली
लांब लांब गावाकडे घेवुन
जायचे.
      लग्न करताना काही सासरच्याना वाटते नवरीला तिच्या माहेराकडुनच सर्व दागिणे
सर्व वस्तु भेटायला पाहिजे त्याच प्रकारे अरे गाडीला हे नाही गाडीला ते नाही याबद्दल पण सारखी भनभन चालु रहायची .
            गाडीत बसल्यावर गाडीचा दरवाजा व्यवस्थित बंद करत नव्हते व चालु व्हायचे गाडीचा खुप आवाज येतो . थोडे समोर
गेल्यावर समजायचे अरे दरवाजा उघडा राहिला मग व्यवस्थित
दरवाजा बंद करायचा मग गाडीचा काहीच आवाज येत
नसे . असे हे प्रत्येक वेळेस व्हायचे .
      घरी आलेल्या वस्तुला आपल्या भारतीय संस्कृतीत
लक्ष्मी समजतात. तिचे आनंदाने
स्वागत करायचे असते . पण त्यागाडी मुळे हमेशा घरी व
बाहेरच्या सोबत वादविवाद स्पर्धा चालु रहायची.
       ती स्पर्धा बंद करण्यासाठी
माझ्याकडे एकच शेवटचा पर्याय राहिला तीला विकण्याचा आणि तीला एका दिवशी विकुन टाकले .
   
          विजय नामदेव त्रिभुवन
            मो.नं. ८६०५८९५२४४

Comments

Popular Posts