शिक्षकांची शाळा
*शिक्षकाची शाळा*
स्वतःला येतात कामाचे फोन
दुसऱ्याला बिन कामाचे .
स्वतःचे मुले गोंधळ करत असेल तर Active.
दुसऱ्याचे मुले गोंधळ घालत असेल तर गोंधळी.
स्वतःच्या वर्गाचे मुले हुशार
दुसऱ्याच्या वर्गाचे मठ्ठ.
जर तोच वर्ग पुढच्या वर्षी आला तर.
२,३ दिवसातच होते जादु.
मठ्ठ वर्ग होतो लगेच हुश्शार .
दुसऱ्याकडे पाचही बोटे दाखवायचे.
कारण तुम्हाला माहित आहे.
एकबोट समोरच्याला दाखविले तर
उरलेली बोटे स्वतःकडे असतात.
काही ठिकाणी तर फक्त नटायची स्पर्धा .
ड्रेस ,लेगीज , साडी आणि मेकपचीच चर्चा .
सगळ्याच कामाचे येते टेंशन.
आणि मागतात वरतुन पेंशन.
एकमेका सोबत नाही पटत .
मनापासुन एकमेकाला नाही भेटत .
बंधुताच्या मशाली याच्यात नाही पेटत.
विजय नामदेव त्रिभुवन
मो.नं.8605895244
Comments
Post a Comment