धम्मक्रांती शिबिर . धम्मचारी अनोमदस्सी
धम्मक्रांती शिबिर .Dhamma Retreat.
दि. १८/१०/२०१७ ते २२/१०/२०१७
त्रिरत्न बौध्दमहासंघ सिडको शाखा औरंगाबाद यांनी आयोजीत केले होते . मार्गदर्शक होते धम्मचारी अनोमदस्सी.
त्या क्रांतीकारी शिबिरात टिपलेले काही मुद्दे.
१) मनुवादी सरकार आल्या पासुन आपल्याला काही धोके निर्माण झाले व त्यासोबत काही संधीही निर्माण झाल्या आहेत. त्या संधीचा आपण काही विचार करणार आहे की नाही.
२) आपण कुठे आहोत हेच आपल्याला माहित नाही.
३) आपण आर्थिक श्रीमंत झालोत पण वैचारिक श्रीमंती कुठे आहे.
४) त्या रमाई माऊलीला साडी भेटली नाही फेट्याची साडी घातली तरीही त्यांनी क्रांती केली.
५) बौध्द धम्माचा उद््य क्रांती आहे . ह्या देशाचा इतिहास बुध्दाशिवाय पुर्णच होऊ शकत नाही.
६) बुध्दत्व हे मानसिक प्रक्रिया आहे. धम्मक्रांती ही उच्चक्रांती आहे .गुणाचा विकास . मैत्रि वाढणे प्रेम वाढणे करूणा वाढणे.समाधानी मनातुनच क्रांती येते . क्रांतीही परिस्थितीवरून येते.मन ध्यानामुळे सजते.तुम्ही जागृत झाल्यामुळे बुध्दत्वाचे गुण तुमच्यात विकसीत होता.
वाटुन खायचे शिका . दान करण्याचा सराव ही क्रांती आहे.
७) भितीतुन क्रांती होत नाही . क्रांतीही प्रेरणेतुन होते.तुमच्या भितीतुन क्रांती होत असेल तर चुक . मनाच्या शिस्तीला क्रांती म्हणतात. माणसे परिवर्तन करणे ही क्रांती आहे . आपण त्या माणसाला बदनाम करतो.
मनातील वाईट विचार ,अकुशल कर्म बाहेर यायला हवे शिक्षित झाले पण सुशिक्षित केव्हा होणार.
बुध्दगुण नष्ट करण्यासाठी जी क्रिया केली जाते तिला प्रतिक्रांती म्हणतात.( बुध्दगुण कोणते आहे विचार करा.?)
८) आपण स्वतःलाच सुधरवु शकत नाही. समाजाला काय सुधरवणार. योग्य संस्काराद्वारे माणसाचे मन बुद्धी यांचा विकास होतो.
९) बुध्द जन्मास येत नाही .ध्यानातुन बुध्द जन्मास येतात. धर्म ही समाज शक्ती आहे .धर्माने व्यक्तीचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. सामाजिक सुधारणा बुध्दापासुन सुरु झाल्या .
१०) धम्मक्रांती अयशस्वी आपण केली . बाबासाहेंबाच्या क्रांतीचा ईतिहास त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांत आहे. विचारात आहे.
समोरचा चुकला तर त्याची जबाबदारी आपण घ्यावी.
११) समाज संकटात सापडतो त्यातुन बाहेर काढण्यासाठी वाट दर्शवित असते ती म्हणजे मानवी बुध्दी किंवा प्रज्ञा. बुध्दांनी सर्वाना मानव म्हणुन बघितले. गरीब श्रीमंत भिखारी राजा रोगी डाकु म्हणुन बघितले नाही.
१२) बौध्दाचा गुणधर्म पुण्यानुमोदन करणे ,कृतज्ञता करणे . उपकार स्मरणे .भारत बौध्दमय करणे म्हणजे एक कुटूंब धम्ममय करणे होय.
१३) गरजा ओळखा , आवश्यक गोष्टी कोणत्या .जो गरज ओळखेल तोच प्रज्ञावान असतो.
१४) मानवी इतिहासातील अतिउच्च घटना कोणती ? गौतम बुध्दाला ज्ञान प्राप्त झाली ही घटना . हे सर्व जगानी मान्य केले आहे. निब्बाण प्राप्त करणे म्हणजे धम्म होय . आसक्ती पासुन दुर राहणे हे छोटे छोटे निब्बाण आहे.
१५ ) भौतिक गोष्टी साधन आहे साध्य नाही.आपण साधनालाच साध्य समजतो . नालंदा विद्यापिठ केव्हाच नष्ट होवु शकत नाही . नालंदा म्हणजे फक्त भिंती नाही. नालंदाचा इतिहास धम्मशिबिरात घडणार आहे.विहारात ग्रंथालयात पुस्तकांत घडणार आहे.१६)
हजारो ग्रंथाचे संशोधन कोण करणार आहे.
An Eyes opening Topic related to Dr. B. R. Ambedkar movement. Revolution and counter Revolution. I like it
ReplyDelete