श्रमणाचे गुण व लक्षण
***** श्रमणांचे गुण व लक्षणे ****
पोस्ट क्रं. १५ "" मिलिद प्रश्न "" या ग्रंथातील काही निवडक भाग.
"" बुध्द धम्महा आचरणाचा धम्म आहे. सांगण्याचा नाही "" त्या मुळे सर्वानी आचरणावर भर द्यावा इतर धर्मातील निर्थक गोष्टी उगळतबसण्या पेक्षा आपल्या धम्मातील चांगल्या गोष्टीचा प्रचार प्रसार करा. व धम्माचे आचरण करा.
श्रमन म्हणजे भिक्षु होण्या अगोदर काही दिवसासाठी चिवर मध्ये रहावे लागते. त्यानंतर काही वर्षाने भंतेजी होता येते. काही दिवसासाठी जे चिवर घेतात त्याना श्रमण व श्रामणेर म्हणतात.
वीस श्रेष्ठ गुण आणि बाहेरील दोन लक्षणे असावे लागतात.
१) ते अरण्य ,वृक्ष व एकांत अशा तीन ठिकाणी वास्तव्य करीत असतात.
२) ते सर्वच चांगल्या गोष्टीत अग्रेसर असतात.
३) ते आपले अधिष्ठान नियमानुसार ठेवत असतात.
४) ते सदाचारी असतात.
५,६) शांत, संयमाने विहार करतात.
७) परम संयमी असतात.
८) क्षमाशील असतात.
९) उत्तम व पवित्र इच्छा बाळगतात.
१०) आचार विचाराने श्रेष्ट असतात.
११) उच्च व पवित्र इच्छा बाळगतात.
१२) विवेकशील असतात.
१३) पापांची लाज भिती बाळगतात.
१४) प्रयत्नशील असतात.
१५) अप्रमादी असतात.
१६) शिक्षापदाचा अभ्यास करण्यात सदैव तत्पर असतात.
१७) धर्माचे न्याज्ञ मिळवण्यासाठी सदैव तत्पर असतात.
१८) शीलाचे पालन करण्यात तत्पर असतात.
१९) तृष्णेवर विजय मिळवणारे आणि
२०) शिक्षापदाचा अभ्यास पुर्ण करतात.हेच त्यांचे स्वतःचे विशेष असे वीस गुण आहेत.
१) काषायवस्त्र धारण करणारे असतात.
२) डोक्याचे मुंडण करणारे असतात.
जाणिव जागृती अभियान
जागे व्हा ..जागे करा..
मानसिक गुलामीतुन मुक्त व्हा मुक्त करा
शिका संघटित व्हा संघर्ष करा.
मो. नं. ८६०५८९५२४४
टिप .या अगोदरील सर्व कविता व पोस्ट.वाचण्या साठी फेसबुक वरील Janiv Jagruti Abhiyan या ग्रुप वरील सर्व पोस्ट वाचा आवडल्यास शेअर करा.
जय भिमराय जय शिवराय
Comments
Post a Comment