धम्मक्रांती शिबिर १
प्रत्येक माणसाला बुध्दीवादी बनविणे हे बुध्द धम्माचे ध्येय आहे.
विज्ञानवादी बनविणे हे बौध्द धम्माचे उद्दिष्ट आहे.
नैतिक दर्जा वाढविण्यासाठी आपल्याला धम्म दिला आहे.
नितिमत्तेची कसोटी पंचशिल . पंचशिलाला नाकारून आम्ही बौध्द व आंबेडकरांचे अनुयायी बनत आहोत.
जुन्या चालिरीती वारसा नाकारण्यासाठी धम्म दिला.
समाजाचा बचाव करायचा असेल तर धम्माशिवाय पर्याय नाही.
गंभीरपणे धम्माचा प्रचार प्रसार करणे ही काळाची गरज आहे.
मी सर्व प्राणीमात्रावर दया करेल व त्याचे लालनपालन करेल.ज्याच्यात करुणा आहे तो मांसभक्षण करू शकत नाही.
बाबासाहेबानी आपल्याला बौध्दधम्म हा बचावासाठी दिला आहे.
नैतिक तत्वामुळे महिलात आत्मबळ आले.
दरेकाने दरेकाला धम्मदिक्षा द्यायला हवी हे आपले तत्व आहे.
मैत्री शिवाय जीवन व्यर्थ आहे. मैत्रीहाच जीवनाचा पाया आहे.
बौध्दधम्म ही समाजाचे परिवर्तन करणारे साधन आहे.
इतर लोक त्याच्या धर्माला प्रामाणिक आहे.पण बौध्द लोक त्याच्या धम्माला प्रामाणिक आहे का??
मनाच्या योग्य संस्काराने व सुस्काराने सुख प्राप्त होते
धम्मपरिवर्तन दिनात सण नसुन परिवर्तनाची नांदी आहे.
डॉ.बाबासाहेबाचे आंदोलन हे पुढच्या पिढीचे संरक्षण आहे.
संघर्ष म्हणजे झगडा नाही.
धम्माकडे बघण्याचा दृष्टीकोन आपला दुय्यम आहे.
बाबासाहेबाच्या अनुयायानी बौध्द समाजालाच समजण्याची गरज आहे.
धम्म म्हणजे केवळ सत्य आहे.सत्याशिवाय दुसरे काहीच नाही.
धम्म म्हणजे केवळ माहितीचा संचय नाही तर जीवनाचे संपुर्ण दर्शन होय.
धर्मातर खुप कठीण आहे.रोप लावण्यासारखे.
दुसरा कोणताही धर्म आंतरीक विकासासाठी प्रेरणा देत नाही.
भगवान बुध्दाने नितीला महत्तवाचे स्थान दिले.नितीचा अभ्यास ही वैज्ञानिक बाब आहे.
त्रिरत्न बौध्दमहासंघा तर्फे समाज प्रवर्तन निवासी धम्म शिबिर दिं ६ नोव्हेबर २०१८ ते १० नोव्हेंबर २०१८ रोजी आयोजीत केले होते. शिबिराचा विषय होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धम्मदृष्टी आणि समाज व्यवस्था.
धम्मचारी: विवेकप्रभ ( वर्धा).
त्यातील काही नोटस.
Comments
Post a Comment