धम्मक्रांती शिबिर पोस्ट क्रमाक २
अकुशल मन नेहमी बैचन असते.अकुशल मन हे नेहमी भरकटत असते .वाईट कामात असते. शिल हे माझे दैवत आहे.शिलवंत सबसे बडा. सर्व रत्नाची खाण आहे.
तिन्ही लोकातील संपदा त्याच्या पुढे छोटी आहे.शिलपालन हे अंतिमतः मध्यतः व शेवटीही कल्याणकारी आहे.
सद् गुणाच्या विकासा करीता नित्य सवयीने जे जे करतो तो आपला स्वभाव . एकमेकाच्या सहवासात राहण्यासाठी शिलाचरण गरजेचे आहे.शिल हे समतेचे तत्व आहे.
जो समाज शिलाचरण करत नाही त्या समाजाच्या जिवनात समता स्वांतत्र्य बंधुता नांदु शकत नाही.
शिलाचरणामुळे एक सामाजीक जाणीव येते.
या जगात गरीबी आहे त्याला बौध्द समाज जबाबदार आहे. कारण बौध्द व्यक्तीचे समाजातील व्यक्ती दुःख नष्ट करण्यासाठी झटतो.
आधुनिक समाजाला शिलाचरणाची गरज आहे.शिलाचरण स्वतः करीता,कुटूंबाकरीता ,जगाकरीता गरजेची आहे.
आपले विद्वान लोक विद्वत्तेच्या नशेत आहे. त्याची विद्वतता कोणीच मोजत नाही. फक्त आपल्याच समाजावर विद्वता दाखविण्याचा प्रयत्न करतात.
आपले श्रीमंत श्रीमंतीच्या नश्यात आहे.आपले राजकीय नेते एकमेकाना विरोध करतात.
या देशात निती व अनितीचा संघर्ष आहे.आज जगात शांतता बुध्दामुळे व बुध्दाच्या तत्वज्ञानामुळे आहे.
मला जे लोक भिंतात आदर करता मी विद्वान आहे म्हणुन नाहीतर माझ्या चारित्र्याकडे बोट दाखविणारा एक ही नाही.प्राण गेले तरी चालेल पण मी शिलभंग करणार नाही.
त्रिरत्न बौध्दमहासंघा तर्फे समाज प्रवर्तन निवासी धम्म शिबिर दिं ६ नोव्हेबर २०१८ ते १० नोव्हेंबर २०१८ रोजी आयोजीत केले होते. शिबिराचा विषय होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धम्मदृष्टी आणि समाज व्यवस्था.
धम्मचारी: विवेकप्रभ ( वर्धा). पोस्ट नं २
Comments
Post a Comment