ईलेक्शन व क्रिकेट मँच
ईलेक्शन व क्रिकेट मँच .
ईलेक्शन व क्रिकेट मँच सेम आहे. त्यामुळे जो सामान्य उमेदवार आहे. त्यानी टेंशन घेवु नये. किंवा नकारार्थी विचार करु नये. क्रिकेट मध्ये कधीही केव्हा ही काही ही होवु शकते . त्याच प्रकारे ईलेक्शन मध्ये ही कधीही केव्हाही काहीही होवु शकते. आता सध्या IPL चालु आहे . विराट कोहली सारखा जागतीक मातब्बर खेळाडु अयशस्वी ठरत आहे . व जे नविन खेळाडु आहे ते मँच पलटुन दाखवत आहे .त्याच प्रकारे जर तुमच्या समोर मातब्बर उमेदवार उभा असेल तर खाबरून जावु नका. तुम्हाला फक्त त्याच्या पेक्षा जास्त मेहनत करावी लागेल . संयम ठेवावा लागेल. डोक्यात हवा जावुन द्यावी लागणार नाही . व पाय सदैव जमिनीवर ठेवावे लागेल.. कारण बांग्लादेशसारखा संघ ही ईतर संघाना पाणी पाजु शकतो.
क्रिकेट वाल्याना मँचच्या अगोदर ज्या प्रमाणे नेट प्रँक्टिस करावी लागते तशीच नेट प्रँक्टिस उमेदवाराला करावी लागते. व काही मातब्बर खेळाडु, डोक्यात हवा गेलेले नेट प्रँक्टिस मन लावुन करत नाही . तर जे नविन खेळाडु नेट प्रँक्टिस खुप मन लावुन करतात. व मँचचा रिझल्ट बदलुन दाखवतात.
वेस्टइंडीज संघाचे १९८० च्या आसपास क्रिकेट वर राज्य होते पण आज.आँस्ट्रिलिया संघाचे ही तेच हाल. क्रिकेट मध्ये शेवटच्या बॉल पर्यन्त सामाना काय असेल कोणीच सांगु शकत नाही. तसेच ईलेक्शन मध्ये ही कुणीच भविष्यवाणी करू शकत नाही.
ज्या प्रमाणे सामान्याचा जो कर्णधार आहे त्याला योग्य टिम निवडावी लागते व त्याच टिम वर संपुर्ण सामान्याचा निकाल अवलंबुन असतो. त्याच प्रकारे उमेदवार त्याच्या सोबत कसले लोक ठेवतात. त्याच्या वर विश्वास दाखवतात का. यावरही त्याचा विजय अवलंबुन असतो. जे मँच बघणारे प्रेशक त्याच्यावर ही मँच चा निकाल अवलंबुन असतो . ते ज्या पध्दतीने टिमला सपोर्ट करता. त्यामुळे खेळणाऱ्या टिमला उत्साह येतो व ती टिम जिंकते. त्याच प्रकारे आपल्या उमेदवाराला प्रोत्साहन द्या. त्याना ही जोश येईल. व समोरच्या उमेदवाराचा पराभव करेल.
विजय नामदेव त्रिभुवन
मो.नं._8605895244
मुकूंदवाडी औरंगाबाद.
Comments
Post a Comment