अभंग बाप

भरारी प्रिमियर लिग तर्फे जी स्पर्धा घेतली त्यात अभंग कविता बाप या विषयावर सादर करायची होती . तर
फेरी क्रमाक ०१ मध्ये ही कविता सादर केली . या मुळे आज मराठी भाषेची थोरवी समजली.

अभंग बाप

आमचा तुमचा । एकच सोबती ।
जगात नांदतो । मुलासाठी ।।१।।

करतो जुगाड । पायाला चटके ।
भरतो भडके । मुलासाठी ।।२।।

आकाश कागद । समुद्राची शाई ।
सगळेच आई । म्हणतात ।।३।।

सगळ्याचा हक्क । बापाच्या पैश्यात ।
नाहीच दुःखात । वाटेकरी ।।४।।

बाप देतो पैसे। मिळते शिक्षण ।
जगतोय क्षण । आयुष्याचे ।।५।।

त्याच्याच कष्टाला । नाहीच किंमत ।
बाप आठवत । गेल्यावर ।।६।।

राबतो उन्हात। भिजे पावसात ।
कुडकुडतात। हिवाळ्यात ।।७।।

बाप गुणवंत । बाप कष्टवंत ।।
बाप भाग्यवंत । गेल्यावर ।।८।।

          विजय नामदेव त्रिभुवन
             मो नं. ८६०५८९५२४४

Comments

Popular Posts