दुष्काळ

भरारी प्रिमियर लिग या स्पर्धेसाठी पहिल्यादाच
अष्टांक्षरी कविता  लिहिण्याचा प्रयत्न केला. पहिल्या फेरीला बाप या विषयावर अभंग लिहिला होता.

    दुष्काळ
मदत न करण्याचा
हमीभाव न देण्याचा
वीज पाणी न देण्याचा
खरे  खत न देण्याचा ||1||

हुंडा न घेता लग्नाचा 
धार्मिक  कर्मकाडाचा
कुंभमेळा करोडोचा
लाखोच्या जाहिरातीचा ||2||

वृक्षतोड करण्याचा
खोटे झाडे लावण्याचा .
खोट्या चारा छावण्याचा.
लवासा उभारण्याचा .||3||

किसान ,जवान जय
फसवेच नारे हाय.
पदवी बळीराज्याची
गतच  फसवायची.||4||

              विजय नामदेव त्रिभुवन
              मो नं. ८६०५८९५२४४

Comments

Popular Posts