पायल तु लढायला हवं होतं.

पायल तु लढायला हवं होतं.

पायल तु लढायला हवं होतं.
पायल तु वाचायला हवं होतं.
पायल तु लिहायला हवं होतं.
पायल तु बोलायला हवं होतं.

बाबासाहेबाची लढाई पुन्हा लढायला हवं होतं.
तुकारामाचे अभंग पुन्हा व्हायला हवं होतं.
शिवरायासारखे पुन्हा स्वराज्य निर्माण करायला हवं होतं.
हेंमत करकरे सारखे भगवे दहशतवादी ओळखायला हवं होतं.
त्या जातीवादी जनावराचा माज तु उतरायला हवं होतं.
बाळासाहेबासारखं वंचित पासुन सत्ते जायला हवं होतं.

तुझी जात लहान होती . त्यात लाज वाटण्यासारखे काय होतं.
तु St प्रवर्गातुन होती त्यात लाज वाटण्यासारखे काय होतं.
तु आदिवासी होती त्यात लाज वाटण्यासारखं काय होतं.
तु भारतीय होती याचा अभिमान तुला वाटायला हवा होता.

अंग काय झाले तुला ते चिडवत होते .
अंग काय झाले तुला ते हिनवत होते .
अंग महापुरूषाचा त्याग आठवायचा ना .
अंग महापुरूषाचा लढा आठवायचा ना .
यां जातीवाद्यानी तर सावित्रीबाईना त्रास दिला
याच जातीवाद्यानी शिवरायाना जहर देवुन मारले .
याच जातीवाद्यानी संभाजीना डोळे फोडुन मारले.
याच जातिवाद्यानी हेंमत करकरेंना श्राप देवुन मारले.

या साठीच सावित्रीमाईनी त्रास सहन केला होता का .
यासाठी बाबासाहेबानी मंंत्रीपदाचा राजिनामा दिला होता का .
यासाठी शिवरायानी स्वराज्या
उभारले होते का .
पायल तु लढायला हवं होतं.
पायल तु वाचयला हवं होतं.
पायल तु लिहायला हवं होतं.
पायल तु बोलायला हवं होतं.
  
         कवि.
        विजय नामदेव त्रिभुवन
        मो नं. ८६०५८९५२४४

Comments

Popular Posts