कावळ्याची गोष्ट
भरारी प्रिमियर लीग स्पर्धेसाठी चित्रकाव्य :::
कावळ्याची गोष्ट
कावळ्याची गोष्ट सर्वच सांगताय
सर्वच सांगताय सर्वच हसताय.
आदर्श फक्त गोष्टी पुरते उरताय.
आणि शेवटी पाणी कागदावरच मुरताय .
तहानलेल्या कावळ्याचे कोणी फोटो काढताय
कुणी कविताय रचताय.
पेडमिडिया तर पाण्यात खेळताना दाखवताय.
एक घोट देण्याचे कुणालाच सुचतनाय.
कावळ्याचा आदर्श फक्त गोष्टी पुरता.
गोष्टीत कावळ्याला ठरवतात महान
पण खरेच भागली असेल का त्याची तहान.
एक घोट पाण्यासाठी त्यानी ही ठेवली असेल संपत्ती गहाण.
म्हणुन मडके भरूनही भागली नाही त्याची तहान.
सरकार दरबारी हाणली असेल त्याला ही वहान.
विजय नामदेव त्रिभुवन
मो नं.८६०५८९५२४४
मुकूंदवाडी औरंगाबाद.
Comments
Post a Comment