सॉरी हा ,चुकीचे सल्ले दिल्यामुळे

सॉरी मित्रानो ,,,,
मी तुम्हाला जे आता पर्यन्त चुकीचे सल्ले दिले ते ऐकल्या वर मला वाटले तुमचा फायदा होईल. पण चुक माझीच होती मी बळजबरी करायला नको होती. असे सल्ले दायला नको होते.
कारण हे तुमचे आयुष्य आहे ,तुमची लाईफ आहे.
मला वाटले मी काही तरी क्रांतीकारी महान कार्य करत आहे .पण मी तर मुर्ख पणा करत होतो. या सल्ल्यामुळे तुम्ही माझी मुर्खात गिणती काढत होता.
मला माझी चुक कळाली मी सुद्धा माझ्या नजरेत आज मुर्खच ठरलो . त्यामुळे पुन्हा एकदा सॉरी.

तुम्हाला बियर पिऊ नका असे म्हटल्यामुळे सॉरी हा,
अरे गुटखा तंबाखु खाऊ नका कँन्सर होईल. त्यामुळे सॉरी हा,
गाडी हळु चालवा अरे अँक्सिडण्ट होईल.
तुम्ही छाती फुगवु फुगवु सांगता मला एवढा हुंडा भेटला तेव्हा मी म्हणालो अरे हुंडा घेवु नको . त्यामुळे सॉरी हा.
काही विद्यार्थ्याना अरे अभ्यास कर आता मेहनत केल्या वर नंतर आयुष्यात आराम राहिल नाहीतर मेहनतच करावी लागेल.
काही कंपनी जाणाऱ्या मुलाना म्हटलो अरे एखादा चांगला बिझनेस बघ . कंपनीत मेहनत करण्यापेक्षा बिझनेस मध्ये मेहनत केली तर यशस्वी होशील.
कोणी गावाकडे चालले तर अरे पाणी सोबत घेवुन जा . मला माहितच नव्हते पाणी विकत भेटते म्हणुन .त्यामुळे सॉरी हा.
काही ना मी हा प्रश्न मुद्दाम विचारतो की तुला मोठ्यापणी कोण व्हायचे .??  मला माहित नव्हते की हा प्रश्न फक्त शाळेत असतानाच विचारायचा असतो ते ही लहान मुलानाच त्यामुळे सॉरी हा.
कोणाचा वाढदिवस असल्यावर मी काहीना प्रश्न विचारला की काय संकल्प केला त्यामुळे सॉरी हा,
वाटत होते की संकल्प फक्त नविन वर्ष सुरू झाल्यावरच करतात.
महापुरूषाच्या विचारा बद्दल तुमच्या सोबत चर्चा केली मला माहित नव्हते की तुम्हाला क्रिकेट हिरो फिल्म ई याबद्दल चर्चा आवडते त्यामुळे सॉरी हा.
आता टेंशन नका घेवु मित्रानो अशी चुकचे सल्ले  मी तुम्हाला यानंतर कधीच देणार नाही .
अशी चुक मी आता तुमच्या सोबत आता पुन्हा करणार नाही. पण जे शिल्लक राहिले त्याना अशी चुकीच्चे सल्ले नक्कीच देणार कदाचीत ते सल्ले  योग्य ही ठरू शकतात.
         
        अप्रसिध्द कवि / लेखक
           विजय नामदेव त्रिभुवन
          मो.नं. ८६०५८९५२४४

Comments

Popular Posts