जैसी सोच तैसे फळ

ज्याच्या त्याच्या कर्माचीच व विचाराचीच  फळे जो तो भोगत आहे .
       पन्हाळ गडावर जायची संधी भेटली.  किल्ला कसा आहे समजायलाच तयार नाही . कुठुन सुरू होतो कुठुन संपतो काहीच कळायला मार्ग नाही . एकटाच होतो. ईतर किल्ल्याला  एकच द्वार असते तेथुन प्रवेश असतो. पण पन्हाळ गडाचे तसे नाही एक मोठ गावच पन्हाळगडावर वसलेले आहे.
    तिथे फिरण्यासाठी वेगवेगळे १५ ते २० स्थळ आहे. एका ठिकाणी गेल्यावर करवंद विक्रीला ठेवले होते. भुक काही नव्हती पण त्या महिलेच्या चेहऱ्यावरील वैताग बघुन त्या महिलेला विचारले  कितीला तर ती म्हणाली २० रुपयाला तर एका पानावरती ते दिले . घेताना वाटले खुप महाग भेटले पन म्हटले जाऊद्या काही गोष्टी विना कारण खरेदी करावी लागतात. काही तासानंतर दुसऱ्या ठिकाणी ही करवंद ठेवलेले होते . ती महिला ही गरिबच होती पन तिच्या चेहऱ्यावर समाधान होते ,हसु होते आनंद होता. पैसे दिले व तेवढेच करवंद घेतले व मनात लगेच विचार आला की जो तो आपल्या कर्माची व विचाराचीच फळे भोगत आहेत. अगोदरची महिला २० रुपये घेवुन ही तिच्या चेहऱ्यावर समाधान नाही व ही महिला फक्त १० रुपये घेते पण तिच्या चेहऱ्यावर किती समाधान होते.
      समाधान , आनंद ,मन शांती  हे काही जास्त पैसे भेटले म्हणुन किंवा कमवले म्हणुन भेटत नाही .  तर आपल्या मनापासुन देण्याच्या ,दुसऱ्याचा आनंद बघण्याच्या व दुसऱ्याचे चांगले होवो कल्याण होवो_ मंगळ होवो. अश्या स्वभावावरच अवंलबुन असतात.
    शेवटी काम ,क्रोध , मत्सर ,मोह ,अहंकार ,व्याभिचार ,
हाव, लालच हे गुणामुळे मानवाचे नुकसानच होते. त्यामुळे मनावर नियंत्रण ठेवुन हे दुर्गुण दुर करावे . व कुशल कर्म करून संयम ,शांती ,करूणा ,ममता, प्रेम दानशुरता हे गुण विकसीत करावे .
 
                  ✍✍ 
             विजय नामदेव त्रिभुवन
             मो नं. ८६०५८९५२४४
              मुकूंदवाडी ,औरंगाबाद

Comments

Popular Posts