नोकरीचे ९ वर्ष

नोकरी चे ९ वर्ष . २ जुलै २०१०

घरात वेळोवेळी येणारी बिकट आर्थिक परिस्थिती , आई वडिलाना करावी लागणारी तारे वरची कसरत, विनय, कुमोद मित्राची मिळालेली साथ व योग्य मार्गदर्शन ,कुठे गावाकडे जाताना बँगेत कपड्या पेक्षा पुस्तकेच जास्त असायची खुप सारे पाहुणे पुस्तक किडा म्हणायचे ,मला ते आवडत असे. प्रवास करताना ही वाचन .

३ वर्ष शिक्षणसेवक ,वस्तीशाळा मुख्याध्यापक चार्ज , ईतर शाळेवर डेपोटेशन ,समायोजन,  जनगणना दोन टप्पे, मतदान ड्युटी ,बिएलओ काम घरोघरी जावुन नविन मतदार शोधणे व नाव नोंदणी करणे, शाळेतील मावशीला वाढण्यासाठी मदत, वेगवेगळे आँडिट, ट्रेनिग , विद्यार्थी पटनोंदणी , शाळाबाह्य विद्यार्थी शोधणे ,पालक भेटी ,  झेंडावंदन त्या दिवशी काढलेल्या प्रभात फेरी, परिपाठाच्या वेळेस गोष्ट सांगणे ,गीत म्हणणे , मधल्यासुट्टीत काही विद्यार्थ्यासोबत गीत म्हणणे, डोंगरगाव कवाड शाळेतील शिर्डी वॉटर पार्कला गेलेली सहल, सांस्कृतीक कार्यक्रम, धामणगाव शाळेतील निसर्ग सहल, सर्व शाळेवरील शिक्षकांनी केलेली मदत सहकार्य. वस्तीशाळा चार्ज असताना अधिकाऱ्याला शाळा तपासणी देण्यासाठी नकार ,त्यांनतर त्यानी केलेले टॉर्चर,
      मुलासोबत त्याच्या सोबत खेळणे , कधीकधी त्याच्या सोबत फिरायला जाणे.  शाळेत न येणाऱ्यामुलाच्या घरी जावुन भेट देणे त्याना खुप आनंद व्हायचा सर घरी आले म्हणुन . विद्यार्थ्यासोबत शैक्षणिक गप्पा मारणे , काही मुलाची घरची परिस्थिती ऐकुन त्याची खुप किव यायची व त्याना वेळोवेळी सहकार्य  करणे.
९ वर्ष सतत मुकूंदवाडी ते शाळे पर्यन्त अपडाऊन कधी बस कधी ट्रँक्स कधी बाईक , कधी ईतराना लिफ्ट देणे किंवा कधी ईतरांच्या बाईकवरून लिफ्ट भेटणे .
  घरातील कामाची नसलेली वस्तु शाळे मध्ये नेणे . व तिचा शाळेसाठी , विद्यार्थ्यासाठी उपयोग करून घेणे , उन्हाळ्यात झाडाला घरुनच खुप साऱ्या बॉटल मध्ये पाणी नेणे .कोणत्या ही कारणावरुन मुलाना बिस्किट वाटप करणे .
मुलाना स्वयं अध्ययन करायची सवय लावणे  ,त्याना आचरणातुन शिकवण देणे .
सर्व काही अविस्मरणीय आहे .
                                 विजय नामदेव त्रिभुवन

Comments

Popular Posts