आत्महत्या करू नये म्हणुन सरकार खालील उपाय योजना करणार
सरकारने लोकांनी आत्महत्या करू नये म्हणुन खालील उपाय योजना केल्या आहेत
या नंतर महाराष्ट्रात व संपुर्ण भारतात एक ही आत्महत्या होणार नाही
होय हे माझे सरकार आहे
१) मंत्रालयाच्या बिल्डीग वरून उड्या मारून आत्महत्या करतात म्हणुन मंत्रालयाच्या ईमारतीच्या बाहेर जाळी बसवली . कोणी उडी मारून अात्महत्या करू नये.
२) कोणी उंच घरावरून आत्महत्या करतात म्हणुन या नंतर भुयारी घरेच बांधण्यासाठी परमिशन भेटणार आहे.
३ ) सिंलिग फँन च्या कंपनी चे लायसन्स रद्द करून त्याना फक्त टेबल फँन बनविण्याची मुभा मिळणार आहे. सर्वाना सिलिंग फँन जमा करून टेबल फँन भेटणार आहे.
४) फवारणीचे औषध पिवुन ही खुप जन आत्महत्या करतात म्हणुन या नंतर ड्युबलिकेट फवारणीचे औषध बनविणार आहे. खत व बियाणे सारखे ड्युबलिकेट
५) पेट्रोल डिझेल रॉकेल घेवुन काही आत्महत्या करतात म्हणुन त्याच्या किंमती ईतक्या वाढविणार की कोणी एक झाकण ही विकत घेवु शकणार नाही.
६) कोणी रेल्वे खाली जावुन आत्महत्या करतात म्हणुन प्लॉटफार्म तिकिटच्या किंमती वाढविणार. रेल्वेपट्टीच्या बाजुला जाळी बसविणार.
७) कोणी नदीत विहीरीत तलावात आत्महत्या करतात. म्हणुन यापुढे फक्त बोगस विहिरी बनविणार
८) नोकरी करणारेही खुप जन आत्महत्या करतात म्हणुन या नंतर सरकारी नोकर भरती बंद
९) रस्त्यावर उभा राहुन कोणी आत्महत्या करतात म्हणुन जागोजागी टोल नाके उभारणार काही ठिकाणी रस्त्यावर खड्डे ठेवणार
१०) काही शाळकरी मुले ही अभ्यासाच्या ताणतणावा खाली आत्महत्या करतात म्हणुन शाळा ही बंद करणार.....
हो़य संपुर्ण महाराष्ट्र आत्महत्या मुक्त होणार
Comments
Post a Comment