शाळेतील एक प्रसंग

*शाळेतील एक प्रसंग- वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारा*
    
     मुले ही अनुकरणप्रिय असतात. मुले ही जास्तीतजास्त समोरच्या व्यक्तीच्या अनुकरणातुन शिकण्याचा प्रयत्न करतात. मुले ही शिक्षकाच्या कृतीतुन शिकतात.
        दि १५ जाने २०१७ रोजी जिपकेंप्राशा धामणगाव ता . फुलंब्री जि . औरंगाबाद इयत्ता ४ थीचे मुले मुलामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोण  निर्माण करणे व अंधश्रध्दा निर्मुलन यावर मी जास्त फोकस करत होतो . तर मला समजले की लाल रंगावर संक्रात आहे . त्यामुळे लाल रंगाचे काहीच घालु नये . अन्यथा अँक्सिंडट किंवा कोणतीही वाईट घटना घडेल . त्यामुळे कोणीच लाल कलर चे काहीच घालु नये . ही गोष्ट मला समजली. मी शाळेत अगोदरच्या दिवशी मुलांना हे सर्व सांगितले . मुले ही घाबरले त्याना ही गोष्ट अगोदरच  माहित होती. त्यामुळे तेही खबरदारी घेणार होते .तर मी त्याना  म्हणालो की उद्या सर्वानी लाल ड्रेस घालुन या ? मी सुध्दा लाल ड्रेस घालुन येणार आहे . बघु  काय होते ते ?

             दुसऱ्या दिवशी शाळेत गेलो तर वर्गातील खुप सारी मुले लाल ड्रेस घालुन आले  होते. पण त्यानी माझ्याकडे बघुन ते घाबरले कारण की मी व्हाईट कलरचे स्वेटर घातले होते.
     परिपाठा नंतर मी वर्गात गेलो . मुली म्हणाल्या सर तुम्ही तर आम्हाला लाल ड्रेस घालायला लावला स्वतः काही घातला नाही.
    मी लगेच व्हाईट स्वेटर काढले तर सर्व मुली खुश झाल्या . माझ्या अंगावर लाल ड्रेस होता.   नंतर माझे लक्ष एका मुलीकडे गेले ती अभ्यासात खुप हुशार होती. पण तिच्या घरातील वातावरण थोडे अंधश्रध्दाळू होते  . मी तिला म्हणालो तु का घातला नाही लाल ड्रेस घाबरलीस का ? तर त्या मुलीनी मला तीने घातलेल्या लाल कलर्सच्या बांगड्या दाखविल्या आणि मला त्या बघुन खुप आनंद झाला . बाकीच्या मुलामुलीनी लाल कलर्सचे स्कार्फ, कानातले  घातले होते . काहीनी रूमाल सोबत आणला  होता .
        
          विजय नामदेव त्रिभुवन
            मो नं. 8605895244
         जाणिव जागृती अभियान
           जागे व्हा जागे करा .

Comments

Popular Posts