लावालावी

*लावालावी*

करतात काही पाठी मागुन चुगली.
भरवतात समोरच्याचे कान.
त्याला वाटते याने देवू नये त्याला मान.

तो किती नालायक, तो किती कपटी,
वाचत राहतात फक्त त्याचेच पाढे.
त्याच्या सोबत तु बोलुच नको,
संपर्क ही ठेवु नको .

असे त्याला मनोमन वाटते .
माझा बदला यांनी घ्यावा असेही त्याला वाटते.

पण स्वतः त्याचेच पाय चाटणार,
त्याच्या सोबत गोड गोड बोलणार.
त्याच्याशी चांगले संबंध ठेवणार.

अशी कोणती निती आहे ही ??

अरे तुला भांडायचे तु भांडणा ,
तुला तो आवड नाही मग तु
त्याच्या सोबत राहु नको ना .

स्वतः त्याच्या सोबत चांगले
रहायचे पण दुसऱ्याना त्याच्या विषयी भडकवणे .

नंतर फक्त गंमत पाहत बसने .
असे खेळ सगळी कडे चालतात.
त्यामुळे रहावे सदा जागृत.
असे कळी चे नारायण ओळखावेत.
             ✍✍✍✍✍
            विजय नामदेव त्रिभुवन
            मुकूंदवाडी औरंगाबाद
           मो नं.8605895244

Comments

Popular Posts