मोडेल मी ....
चित्र कविता.
मोडेल मी...
मोडेल मी ,
वाकेल ही मी
झुकेल ही मी
पण तुझाच विचार माझ्या मनात सदैव राहिल.
जाळा मला,
तोडा मला
काहीही करा,
पण तुमच्या साठीच माझे आयुष्य राहिल.
पाने घ्या
फुले घ्या
फळे घ्या
सर्व काही घ्या
सर्व काही तुमच्याच चरणी अर्पण करेल.
आँक्सिजन घ्या
सावली घ्या
जाळण्यासाठी लाकडे घ्या.
मी जळालो
तरीही तुम्हाला ऊबच देईल.
विजय नामदेव त्रिभुवन
मो. नं. ८६०५८९५२४४
Comments
Post a Comment