घरामधील वस्तु
आपल्या घरामध्ये पडलेल्या निर्थक वस्तु एखाद्याच्या आयुष्या मध्ये खुप आनंदाई ठरू शकते .त्या वस्तु समोरच्या साठी ऐवढ्या आनंदीदायी ठरेल की त्याचा आनंद बघुन तुम्हाला ही आनंद भेटेल. माझी मुलगी विपश्यना तिच्या कडे २ कंपास होते . त्यातील एक कंपास मी शाळेतील एका मुलाला दिला . त्याला खुप आनंद झाला . वर्गात सर्व मुलाकडे कंपास होते फक्त त्याच्याकडेच कंपास नव्हता . त्याला दिला तर त्याला खुप आनंद झाला त्यानंतर त्याने त्याच्या दप्तरातील पेन पेन्सिल खोडरबर पट्टी रंग खडु सर्व त्या कंपासामध्ये ठेवल्या अतिशय चांगल्या पध्दतीने त्याने तो कंपास सजवला . बिचारा कंपास घरी धुळ खात एका कोपऱ्यात पडलेला होता.आज त्या कंपासाला ही आनंद झाला असेल.कंपासाचे आयुष्यही आता सार्थकी जाईल.
भगवान महावीर यांनी जे चार शिल सांगीतले आहे त्यात संग्राहक वृत्ती ठेवु नका . प्रत्येकाच्या घरात कपाटात खुप साऱ्या वस्तु,खेळण्या ,पेन ,पुस्तक ,वह्या कपडे, भांडे ,धुळ खात पडत आहे . त्या जर आपण त्या गरजुना दिल्यातर आपल्यलाही व समोरच्याला ही नक्कीच आनंद होईल. आनंदसाठी लाखो रुपये खर्चन्याची गरज नाही.
विजय नामदेव त्रिभुवन
स.शि. जिपप्राशा जु सा का
केंद्र ता. फुलंब्री
Comments
Post a Comment