आदर्श व्यक्ती शिवाजी साळवे सर

आदर्श व्यक्ती शिवाजी साळवे सर

आदर्श व्यक्ती ,आदर्श शिक्षक , आदर्श  केंद्रप्रमुख शिवाजी कोंडीराम साळवे सर.
केंप्राश फुलंब्री येथे कार्यरत आहे .
हे उन्हाळ्यात दरवर्षी झाडे जगावे म्हणुन घरून येताना त्याच्या सोबत पाच सहा पाण्याच्या बाटल्या भरून आणतात व रस्त्यावरील जे झाडे वाळायला सुरूवात झाले त्याना नेवुन टाकतात. व शाळेतुन वापस जाताना पुन्हा त्या सर्व बाटल्या भरून घेतात व रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला टाकतात. हा उपक्रम त्याचा रोज नित्य चालु असतो . झाडा बद्दल एवढी करूणा . आश्चर्याचीच गोष्ट आहे . एकीकडे रस्ते बांधण्यासाठी मोठे मोठे वृक्ष तोडले जातात. शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी रोज लाकडे जाळली जातात. भिकार्डी सरकार शाळेला गँस ही देवु शकत नाही .लाकडे तोंडण्याची बखार मंडळ आणखीन चालु आहे . पोलिसांना व वन खाते यांना हप्ते देवुन रोज डोंगर,जंगलातुन झाडे तोडली जातात.  व जंगलाच्या जंगल एखाद्या कंपनीला उद्योग उभारायला  दिली जातात.

** मागच्या वर्षी फुलंब्री पतसंस्थाचा लांभाश वाटप झाला . त्या लांभाश वाटपची माहिती होण्यासाठी एक मँसेज आला होता . त्याची सुरूवात अशी होती. खुशखबर खुशखबर मी तो मँसेज ईतरांना माहित व्हावे म्हणुन ग्रुप वर टाकला . मला लांभाश 13 हजार रुपये भेटला होता .तसा मला ही काही जास्त आनंद झाला नव्हता .एका सरांचा मँसेज आला यात खुशखबर ची काय गोष्ट आहे . आपलेच पैसे आपल्याला देत आहे . त्याना ही लांभाश 8,9 हजार भेटला असेल .
दोन तीन दिवसानंतर साळवे सर भेटले सहज विषय निघाला तर ते सांगायला लागले त्या दिवशी लांभाश भेटला तर सर घरच्यासाठी रसगुल्ल्याचा 110 रूपयावाला  डब्बा घेवुन गेले . तर त्याच्या पत्नीने विचारले आज काय आनंदाची बातमी आहे . तर सरांनी सांगीलते पतसंस्थेचा डिव्हिडण्ट भेटला 150 रुपये .
माझ्या समोर प्रश्न उभा राहिला असे कसे काय ईतरांना जास्त पैसे भेटुन ही आनंद झाला नाही. सरांना ईतका आनंद कसकाय झाला .
शाळा भेट द्यायला आल्यावर वर्गात जावुन दिवस भर अध्यापन करतात.
एकदा मुल्यवर्धनची ट्रेनिग होती त्यात त्यानी एक बोधकथा सांगीतली नंतर बोध सांगताना असे सांगितले की आपला पगार हा पुर्ण आपला नसतो त्यात आपल्या आई वडिलाचा भाऊ बहिण नातेवाईक व समाज व रस्त्यावरील जे गरिब व्यक्ती आहे त्याचा ही यात वाटा असतो .
आपल्या पगारात भिखार्याचा ही वाटा आहे. असे म्हणारे साळवे सर हे किती दानी आहे यांचा अंदाज येतो.
     सरा सोबत राहुन सदैव  चांगल्या कामाची विचाराची कृती करण्याची प्रेरणा मिळते . आयुष्य कसे आनंदाने जगावे व समाधानी कसे रहावे हे समजते.
     धन्यवाद सर तुमची साथ आम्हाला सदैव अशीच भेटत राहो .
          ✍✍✍✍✍
         विजय नामदेव त्रिभुवन
         मो.नं.8605895244
      जाणिव जागृती अभियान
         जागे करा जागे व्हा

Comments

Popular Posts