विवाह्य बाह्य संबंध

कुणाला अशी शारिरीक ईजा करने वाईटच आहेत.
पण या घटनेतील दुसरी बाजु ही समजुन घ्यायला हवी . बायको ने पतीवर शारिरीक ईजा केली पण नवरा बायकोवर जो मानसिक ईजा करत होता त्याचे काय . समाजात अशी ही एकमेव घटना नाही अनेक घटना घडत आहे . लग्ना नंतर लफडे करायची काहीच गरज नाही .काहीना तर हौसच लागली आहे . सध्या प्रमाण कमी आहे पण अश्या नालायकांमुळे समाजात हे प्रमाण वाढत आहे . ज्याना अशी लफडे करायची त्यांनी लग्नच करू नये . किंवा लग्ना नंतर अशी लफडे करायचे असेल तर अगोदरच्या पत्नीला किंवा पतीला रितसर तलाक द्यावा . मग खुशाल भाद्रपद महिन्यातील कुत्र्या व कुत्री सारखे आयुष्य जगावे. एवढ्या रात्री कोणत्या कामाचा फोन आला होता ? एक एक घंटा रात्री एवढे कामाचे काय बोलणे होते .  बोलणे होते की लफडे होते ??
               काही ना वाटते हम छुपे रुस्तम है . समोरचे जग सर्व मुर्ख आहे . आपले हे विवाहबाह्य संबंध कुणालाच समजणार नाही . पण प्यार छुपता नही . लक्षात येतेच. whatsapp वर क्लियर चँट करा किंवा दुसर्या नावाने नंबर सेव्ह करा.  तोंडाला कितीही मोठा स्कार्फ बांधा , हेल्मट घाला . कारच्या काचेला काळे कव्हर लावा .  फेसबुक वर फेक खाते उघडा तुम्ही नागडे होणारच. मोबाईल वर फेसलॉक ठेवा नाही तर पँटर्न लॉक ठेवा , कोणताही पासवर्ड ठेवा .
     काही जे कुत्रे टाईप माणसे किंवा स्त्रीया असतात त्यांना स्वतःच्या बायका सोबत किंवा नवर्या सोबत फिरायला जायला आवडत नाही ,वेळ भेटत नाही  . पण दुसर्या सोबत जाता  फिरायला . तुम्ही कुठे ही फिरायलाजा थेटर मध्ये जा नाही तर लॉज मध्ये  . अंतराळात जा नाही तर पाताळात जा . तुमच्या डोक्यातील जो हव्यास , व्याभिचार आहे तो तुम्हाला खड्यातच घेवुन जाणार व गड्यातच गाडणार .
            नाव कमवायला संपुर्ण आयुष्य लागते पण नाव गमवायला एक छोटीशी वाईट कृती बस झाली .
        आज कालची नविन  शहरातील पिढी इंग्रजी मिडीयम वाली खुपच अवघड झाली सर्व नसले तरी खुप सारे आहे .शाळेत वेगळी किंवा वेगळा घराच्या आजुबाजुला एक, ट्युशन मध्ये एक, कॉलेज मध्ये एक , गावाकडे एक . फेसबुक वर वेगळा टिवट्टर वर वेगळा, व्हॉटसअँप वर वेगळा ,टेलीग्रामवर वेगळा .
              फिल्म बघायला गेले तर कॉर्नर सिट वर बसुन वेगळेच चाळे चालु राहते . थेटरवाल्याना हे माहित असते .ट्युशन कॉलेजच्या नावाने वेगळेच खेळ . खुप सारे नामांकित हॉटेल मुलामुलीना रुम उपलब्ध करून देतात. जे लोक अश्या हॉटेल वाल्याकडुन हप्ते घेतात (फक्त पोलिसवाले गृहीत धरू नये पत्रकार, मिडीया  ही आहे ) त्यांनी लक्षात ठेवा वो दिन भी दुर नही तुम्हारे घर मे भी तुम्हारी औलाद है । तुम्हारे घर भी शिंशेके है ।
                दोन  वर्षापुर्वी कामगार चौक औरंगाबाद येथे एका मुलाने माझ्या गर्लफेंड सोबत बोलतो म्हणुन त्याच्या अंगावर पाच ,सहा वेळा कार घातली होती . त्यावेळेस मला काही  प्रश्न पडले
1)  याच्या गर्लफेंडने दुसर्यामुला सोबत का बोलावे ? एक पुरत नाही का ??
2) यांची गर्लफेंड अशी का जी दुसर्यामुला सोबत बोलते ? अश्या फालतु मुलीला सोडुन द्यायचे ना ??
3) जो मुलगा अपघातात मरण पावला त्याला माहित होते ह्या दोघांचे अफेयर आहे तर याने तिच्या सोबत का बोलायचे  ??
     या प्रश्नाची उत्तरे मला भेटणार नाही .
       पाश्चिमात्य देशात 90% लग्न हे 3,5 वर्षच टिकते . भारतात तर 7 जन्माचे नाते असते पण अश्या वातावरणामुळे अमेरिकेसारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे ¿¿¿
सॉरी हा मी तुमच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर, अभिव्यक्तीवर गदा आणत आहे आणि मी जुन्या विचाराचा आहे त्यामुळे मला माफ करावे.
            खुपजन या मँसेज शी सहमत नसेल पण सत्य परिस्थिती अशीच आहे ?
माझ्या संपर्कातील एक दोन जन अशेच आहे त्याचा नंबर मी इम्रान हाश्मी म्हणुन सेव्ह केला होता .
टिप. ह्या परिस्थितीला  Bollywood वाले  व राजकारणी अजीबात कारणीभुत नाही . व मला कोणीही  संशयी म्हणु नये.
     
                अप्रसिध्द कवी / लेखक
                विजय नामदेेव त्रिभुवन
                मो. नं.8605895244
                 मुकूंदवाडी औरंगाबाद

Comments

Popular Posts