धोंड्याचा महिना
*धोंड्याचा महिना*
महिना सुरू झाला धोंड्याचा,
महिना सुरू झाला धोंड्याचा.
सासर्यांना लुटायचा.
लग्नात हुंडा घेवुन पुरत नाही यांच्या मड्याला.
आणखिन पैसे लागतात यांना उडवायला.
किती दिवस सासर्याच्या जीवावर खायचे,
गोड बोलुन किती दिवस लुटायचे,
धोंडा नाही दिला म्हणुन अत्याचार करायचे.
का म्हणुन हे सहन करायचे..
स्वतःला साजरा करायचा तर करा.
दुसर्याला का बळजबरी करायची.
किती दिवस अशीच भीक मागायची.
सासर्यानी दिलेल्या वस्तुवर कश्याला फुशारकी मारायची.
विजय नामदेव त्रिभुवन
मो. नं.8605895244
मुकूंदवाडी औरंगाबाद.
Comments
Post a Comment